Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

What is mock drill :माॅक ड्रिल म्हणजे काय? देशात का होत आहे माॅकड्रिल? फक्त 3 मुद्द्यांत समजून घ्या

What is mock drill : जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून देशभरातील महत्त्वाच्या 259 शहरांमध्ये युद्धजन्य परिस्थितीची मॉकड्रिल अर्थात रंगीत तालिम घेण्याचा निर्णय घेतला आहे. या माॅकड्रीलचे अनेक उद्देश आहेत, राष्ट्रीय आणि स्थानिक सुरक्षेसाठी हे माॅकड्रिल महत्वाचे असतात. तत्पुर्वी आज पहाटे दोनच्या सुमारास भारताने पाकिस्तानची दहशतवादी तळं नष्ट केली.

यानंतर आज बुधवारी 7 मे रोजी देशात माॅकड्रिल होत असून महाराष्ट्रात एकाचवेळी 16 ठिकाणी मॉक ड्रिल्स केले जात आहे, पण हे माॅकड्रिल म्हणजे काय ते का केले जात आहेत हे आपण समजून घेऊया.

What is mock drill

माॅकड्रिल म्हणजे काय?

देशात जेव्हा सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण होतात, त्यासाठी गुप्तचर संस्था माहिती देत असते. त्यासाठी सुरक्षा दले असो वा स्थानिक प्रशासन माॅक ड्रिल करत असते. आपल्याकडे गणेशोत्सव, 26 जानेवारी, 15 ऑगस्ट असो किंवा सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जातात.या उपाययोजना राबवण्यासाठी, सुरक्षेची पुर्वतयारी पडताळून पाहणे म्हणजे माॅकड्रिल होय. यालाच रंगीत तालिम हा शब्दही आहे. सुरक्षा यंत्रणा अशा माॅकड्रिल वेळोवेळी, सुचनांनुसार आणि गरजेप्रसंगी सुरक्षेचा आढावा घेण्यासाठी, आपली यंत्रणा किती दक्ष आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि संकटप्रसंगी सज्ज आहोत, याची जाणीव निर्माण करुन देण्यासाठी माॅक ड्रिल केले जातात.

माॅक ड्रिल का होत आहेत?

1. संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची खात्री करून घेणे, हा माॅकड्रिलमागचा मुख्य उद्देश आहे.

2. पहेलगाम येथे झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशात एखादा हल्ला झाल्यास हल्ल्याला तोंड देता याव यासाठी "माॅकड्रील" करण्यात येत आहे.

3. युद्धजन्य किंवा आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कोणती सर्तकता बाळगावी, तसेच प्रशासनाने कोणती पावले उचलावी, यासंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. याची रंगीत तालिम म्हणजे माॅकड्रिल होय.

What is mock drill

महाराष्ट्रात 3 गटात माॅकड्रिल

  • महाराष्ट्रातील 16 ठिकाणांची 3 गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या गटात अति संवेदनशील ठिकाणांचा समावेश असून, यामध्ये मुंबई, उरण आणि तारापुर या तीन ठिकाणांचा समावेश आहे.
  • दुसऱ्या गटात ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-धाटाव-नागोठाणे, मनमाड, सिन्नर, थळ वायशेत, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे.
  • तिसऱ्या गटात छत्रपती संभाजीनगर, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणांचा समावेश आहे. या सर्व ठिकाणी बुधवारी मॉकड्रिल घेण्यात येणार असून, नागरी संरक्षण यंत्रणांना त्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

    What is mock drill

    मुंबईत माॅकड्रिल

    मुंबईत मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे मॉक ड्रिल रिहर्सल पार पडली आहे. आरपीएफने टीम, स्निफर डॉग आणि इतर उपकरणे आणि उपकरणांसह, रिहर्सल केली आहे.

    रत्नागिरी जिल्ह्यात उद्या माॅकड्रिल

    रत्नागिरी जिल्ह्यात उद्या (सात मे) रोजी सायंकाळी चार वाजता पाच ठिकाणी ऑपरेशन अभ्यास रंगीत तालीम करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी सायरन वाजवला जाणार असून, या कालावधीत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केलं आहे. रत्नागिरी तहसीलदार कार्यालय, रत्नागिरी रेल्वेस्थानक, राजापूर नगरपालिका, दापोली आणि संगमेश्वर तालुक्यातली प्रत्येकी एक ग्रामपंचायत अशा पाच ठिकाणी मॉक ड्रिल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

    What is mock drill

    सिंधुदुर्ग जिल्ह्यातही उद्या माॅकड्रिल

    पहेलगाम इथं झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एखादा हल्ला झाल्यास हल्ल्याला तोंड देता याव यासाठी गृह मंत्रालयाकडून सर्व राज्यात "माॅकड्रील" करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या 7 तारखेला सिंधुदुर्गात दुपारी 3 ते 3.20 या काळात मालवण, वेंगुर्ला, सावंतवाडी, कणकवली या नगरपालिका क्षेत्रात तर रात्री 8 ते 8.15 या काळात देवगड, वेंगुर्ला आणि मालवण या सागरी भागात वीज बंद करून "ब्लॅक आऊट" करण्यात येणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+