झारखंडमध्ये यावेळी सत्ताबदल? काय सांगताहेत वेगवेगळे एक्झिट पोल, वाचा एका क्लिकमध्ये
Jharkhand Exit Poll 2024- झारखंडमध्ये आज ८१ जागांसाठी मतदान पार पडले. आता मतदानानंतर वेगवेगळे अंदाज येऊ लागले आहेत. झारखंड निवडणुकीबाबत वेगवेगळ्या एक्झिट पोलनुसार तेथे भाजपची सत्ता येण्याचे संकेत मिळत आहेत. हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाला यावेळी झटका बसू शकतो, असे काहीचे म्हणणे आहे. काय सांगतात वेगवेगळे एक्झिट पोल हे आपण पाहूया...

एबीपी - मँटराइज एक्झिट पोल
मॅटराईज एक्झिट पोलनुसार भाजपला 42-47 जागा, जेएमएम व काँग्रेसला 25-30 ते जागा, व इतरांना एक ते चार जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टाइम्स नाऊचा अंदाज
टाइम्स नाऊच्या अंदाजानुसार झारखंडमध्ये एनडीए सरकारला 40 ते 44 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर, जेएमएमच्या इंडिया आघाडीला 30 ते 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर, एखाद्या अपक्षाला संधी मिळू शकते.
चाणक्य एक्झिट पोल
चाणक्यच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 50 जागा, तर इंडिया आघाडीला 35 ते 38 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतर स्थानिक पक्ष आणि अपक्षांना 3 ते 5 जागा मिळू शकतात.
पिपल्स पल्स एक्झिट पोल
पिपल्स पल्सनुसार एनडीएला 42 ते 48 जागा मिळू शकतात. तर इंडिया आघाडीला 16 ते 23 जागा मिळू शकतात. तर काँग्रेसला 8 ते 14 जागा मिळू शकतील.












Click it and Unblock the Notifications