अधिवेशनात मांडली जाणारी १६ विधेयके कोणती? नेमके काय आहे त्यात? जाणून घ्या, सर्व प्रश्नांची उत्तरे
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात होईल. उद्या संससदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर होईल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी १६ विधेयकांची यादी तयार करण्यात आली आहे. संसदेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रपती पारंपारिक बग्गीवरून संसद भवनात पोहोचतील. त्यांचे भाषण ११ वाजता होईल, यानंतर आर्थिक सर्वेक्षण सादर केले जाईल. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कोणती १६ विधेयके मांडली जाणार आहेत? याची माहिती आपण पाहूयात...

कसे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आज ११ वाजता लोकसभा व राज्यसभेला संबोधित करतील. त्यांच्या अभिभाषणाने आज अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होईल. त्यानंतर उद्या नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करतील. सत्राचा पहिला भाग १३ फेब्रुवारी रोजी संपेल आणि दुसरा भाग १० मार्च रोजी सुरू होईल तर, सत्र ४ एप्रिल रोजी संपेल. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाईल.
बैठकीस ३६ पक्षांची उपस्थिती
आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशासंर्भात विविध मुद्यांवर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय नेत्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी या बैठकीचे आयोजन केले. या बैठकीला मंत्र्यांसहीत ३६ राजकीय पक्षांचे एकूण ५२ नेते उपस्थित होते.
कोणती आहेत १६ विधेयके?
१. बँकिंग कायदे सुधारणा विधेयक, २०२४
२. रेल्वे सुधारणा विधेयक २०२४
३. आपत्ती व्यवस्थापन सुधारणा विधेयक २०२४
४. तेलक्षेत्र नियमन व विकास सुधारणा विधेयक २०२४
५. बाँयलर विधेयक २०२४
६. गोवा विधानसभा मतदारसंघात अनुसूचित जमातींचे प्रतिनिधीत्वाचे पुनर्नियोजन विधेयक २०२४
७. वक्फ बोर्ड रद्दबातल विधेयक २०२४
८. वक्फ सुधारणा विधेयक २०२४
९. बिल्स ऑफ लोडिंग, जहाजावरील मालभरण विधेयक २०२४
१०. समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक २०२४
११. किनारपट्टी नौवहान विधेयक २०२४
१२. मर्चंट शिपिंग विधेयक २०२४
१३. वित्त विधेयक २०२५
१४. हवाई वाहनांमधील हितसंबंधाचे संरक्षण विधेयक २०२५
१५. त्रिभुवन सहकारी विद्यापीठ विधेयक २०२५
१६. स्थलांतरील व परदेशी व्यक्ती विधेयक २०२५












Click it and Unblock the Notifications