West Bengal: बीरभूमच्या कोळसा खाणीत भीषण स्फोट, 7 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
Birbhum Coal Mine Blast: पश्चिम बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातून एक मोठी दुर्घटना समोर आली आहे. येथे भादुलिया ब्लॉक कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. ज्या खाणीत हा स्फोट झाला ती खाणी बीरभूम जिल्ह्यातील लोकपूर पोलीस स्टेशन परिसरात आहे.
स्फोटानंतर खाणीत काम करणाऱ्या कामगारांमध्ये एकच गोंधळ उडाला. जीव वाचवण्यासाठी कामगार धावू लागले. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहेत.

कोळसा क्रशिंग दरम्यान स्फोट
स्फोटात जखमी झालेल्या कामगारांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्या खाणीत स्फोट झाला त्या कोळसा खाण कंपनीचे नाव गंगारामचक मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कोलियरी (GMPL) आहे. वृत्तानुसार कोळसा क्रशिंग दरम्यान खाणीत स्फोट झाल्याची माहीत आहे. या स्फोटात कंपनीचे अनेक कर्मचारी जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे.
VIDEO | Blast at Bhadulia Block coal mine claims two lives, injures four persons in Birbhum district of West Bengal.#birbhum pic.twitter.com/EwVvvqzlLJ
— Press Trust of India (@PTI_News) October 7, 2024
कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात एक ट्रक पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. कोळसा क्रशिंगसाठी खाणीत स्फोट होत असताना अनावधानाने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. स्फोटाचा मोठा आवाज येताच घटनास्थळी उपस्थित कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी खाणीतून तात्काळ पळ काढला.












Click it and Unblock the Notifications