वायनाडचे भयान दृष्य, चालियार नदीत सापडले 10 मृतदेह, चिखलात अडकलेल्या व्यक्तीचा जगण्यासाठी संघर्ष
वायनाड: केरळातील वायनाड जिल्ह्यात भूस्खलनानंतर भयाण वास्तव समोर आलं आहे. चुरलमाला येथील परिस्थिती अत्यंत गंभीर असून डोळ्यांदेखत अनेक घरं उद्धवस्थ झाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. गंभीर बाब म्हणजे एक व्यक्ती चिखलात अडकल्यानंतर जिवाचा आकांत करतानाचे फुटेजही समोर आले आहे.
'ब्लॉक डिव्हिजन' सदस्य राघवन यांनी वनइंडिया मल्याळमला सांगितले की, भूस्खलनानंतर चुरलमाला येथील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राघवन पुढे म्हणाले की, एक व्यक्ती डोळ्यासमोर चिखलात पडली आहे आणि त्याला वाचवण्याचे प्रयत्न अयशस्वी होत आहेत. त्याचे फुटेज समोर आले आहे.

सकाळपासून चिखलात फसली व्यक्ती
एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहचले असून झाडांमध्ये मृतदेहाचे अवशेष अडकले आहेत. अनेक घरे उद्ध्वस्त झाल्याचेही राघवन सांगतात. डोळ्यासमोर चिखलात अडकलेली व्यक्ती दिसते. ती सकाळी साडेसात वाजल्यापासून तशीच अडकलेली दिसत आहे. घटना घडली तेव्हा आमच्यापैकी काहीजण तेथून सुरक्षितस्थळी पोहचले पण या व्यक्तीचा सुरक्षितस्थळी जाण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. ती व्यक्ती आधी थोडा वर तरंगत होती, आता ती व्यक्ती पुन्हा खाली आले आहे.
एवढा चिखल की पाय ठेवणे अशक्य
राघवन म्हणतात की या व्यक्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि जरी NDRF चे पथक तिथं आले पण या व्यक्तीला काढण्यात अद्याप यश आले नाही. राघवन ह त्या व्यक्तीच्या 100 मीटरपेक्षा जास्त अंतरावर आहेत आणि यादरम्यान पाणी साचून एक मोठी नदी बनली आहे. भूस्खलनामुळे येथे मोठ्या प्रमाणात चिखल झाला असून पाय ठेवणेही शक्य नाही.
घरं पाण्यात, बचावात अडथळे
परिसरातील सर्व घरे पाण्यात आहेत. हा परिसरच पाण्याने वेढला असून अद्याप कोणतीही बचाव यंत्रणा तेथे उपलब्ध नाही. एनडीआरएफ विविध ठिकाणी जाऊन आपत्तीग्रस्त भागात पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे. वीज कनेक्शन आणि इंटरनेट कनेक्शन सर्व खंडित झाले आहेत. लोकांना बाहेर काढण्याचा कोणताही मार्ग सध्या नाही. पाऊस थोडा कमी झाला असला तरी बचावकार्य अवघड असल्याची माहितीही राघवन यांनी दिली.
सततचा पाऊस आणि डोंगराला आलेल्या पुरामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. दरम्यान, भूस्खलनात मृतांचा आकडा वाढत आहे. मलप्पुरममधील चालियार नदीतून सुमारे 10 मृतदेह सापडले आहेत.












Click it and Unblock the Notifications