वक्फ बोर्ड बनणार बाहूले! कायदा होण्यासाठी विधेयक एक पाऊल दूर; राज्यसभेत काय घडलं, कुणाला किती मतं?
Waqf Amendment Bill 2025 passed in Rajya Sabha : केंद्र सरकारने आणलेल्या मालमत्तांशी संबंधित वादग्रस्त वक्फ दुरुस्ती विधेयकाला लोकसभेनंतर राज्यसभेची मंजुरी मिळाली आहे. गुरुवारी (3 एप्रिल, 2025) प्रदीर्घ चर्चेनंतर हे विधेयक समर्थनार्थ 128 मतांनी आणि विरोधात 95 मतांनी मंजूर झाले आहे. नवीन सुधारणा विधेयकांमुळे वक्फ बोर्डाच्या अधिकारावर नियंत्रण येणार असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत, विरोधी पक्षाने या विधेयकाला कडाडून विरोध केला होता.

लोकसभेत विधेयक मंजूर
वक्क सुधारणा विधेयक लोकसभेत 2 एप्रिल रोजी मंजूर झाले होते, तिथे 288 खासदारांनी बाजूने आणि 232 विरोधात मतदान केले होते. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ठराव मांडला होता.
राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयकावर दुपारी 1 वाजता सुरू झालेली चर्चा राज्यसभेत पहाटे 2.30 वाजेपर्यंत सुरू होती. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. विरोधकांनी या विधेयकाचे वर्णन अल्पसंख्याक विरोधी असल्याचे म्हटले आहे, तर सरकारने हे पारदर्शकता आणि सुधारणांच्या दिशेने एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान बिजू जनता दलाने वक्फ दुरुस्ती विधेयकावर आपली भूमिका बदलली. बीजेडीच्या यू-टर्नमागे काय कारण आहे हे मात्र स्पष्ट झाले नाही, मतदानादरम्यान, विरोधकांनी मांडलेले दुरुस्ती प्रस्ताव आवाजी मतदानाने फेटाळण्यात आले आणि शेवटी बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करण्यात आले.
तत्पूर्वी लोकसभेतही यावर प्रदीर्घ चर्चा झाली. यापूर्वी 2 एप्रिल 2025 रोजी या विधेयकावर लोकसभेत 12 तास चर्चा झाली होती. या चर्चेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आपापली बाजू मांडली. शेवटी बहुमताने विधेयक मंजूर झाले.
वक्फ विधेयकावर राज्यसभेत जोरदार चर्चा
वक्फ विधेयकावर राज्यसभेत जोरदार चर्चा झाली त्यानंतर हे विधेयक राज्यसभेतही समंत झाले आहे. त्यामुळे आता फक्त राष्ट्रपतींची शिक्कामोर्तब या विधेयकावर बाकी आहे. हे विधेयक कायद्यात रुपांतरीत होण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. आता ते विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार आहे. राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक कायदा बनून संपूर्ण देशात लागू होईल.












Click it and Unblock the Notifications