Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मान्सूनचा आनंद लुटायचा आहे? देशातील ही ठिकाणे आहेत बेस्ट

मुंबई : वर्षभर आपण आपापल्या कामात व्यस्त असतो. ताण - तणाव असतो. परंतु मान्सूनचा पहिला पाऊस वातावरणात आणि आपल्या मुडमध्ये नवचैतन्य घेऊन येतो.

Hill Stations

भारतामध्ये मूलतः दक्षिणेकडील केरळ, कर्नाटक, तामिळनाडू , आंध्रप्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यात सुरुवातीच्या काळात मान्सून दाखल होतो. या राज्यात मान्सूनमधील पर्यटनासाठी अनेक ठिकाणे आहेत, अशा काही प्रमुख ठिकाणांची माहिती घेऊयात.

मुन्नार, केरळ:

केरळ राज्यात मान्सून जूनच्या अगदी सुरुवातीलाच दाखल होतो. केरळमधील मुन्नार हे ठिकाणी उन्हाळा , हिवाळा आणि पावसाळी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. मुन्नारला जाण्यासाठी कोचीमधून घाटरस्ता आहे. तर कर्नाटकमधून घाटरस्त्याने मुन्नार येथे जाणे शक्य आहे.

महाबळेश्वर, महाराष्ट्र:

आपल्या राज्यातील महाबळेश्वर हे ठिकाणी पावसाळी पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. सातारा शहरापासून महाबळेश्वर अवघ्या 60 किमी अंतरावर आहे. देशभरातील पर्यटकांचे महाबळेश्वर, पाचगणी हे आकर्षणाचे केंद्र आहे. महाबळेश्वर परिसरात खोल दऱ्या आणि गर्दी झाडी मन मोहून टाकते.

उटी, तामिळनाडू:

तामिळनाडूतील उटी हे जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असून हे ठिकाण पावसाळ्यात देखील पर्यटकांच्या गर्दीने फुलते. उटी हे ठिकाण निलगिरी पर्वत रांगेत आहे. चहाचे मळे आणि अनोखी खाद्यसंस्कृती लक्षवेधी आहे. तामिळनाडू सरकारला या ठिकाणावरून पर्यटनातून मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्ती होते.

तिरुमला, आंध्रप्रदेश:

आंध्रप्रदेश राज्यातील तिरुमला तिरुपती बालाजी हे एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्याचबरोबर या भागात तुम्ही पावसाळ्याचा मनमुराद आनंदही घेऊ शकता. हा संपूर्ण भाग डोंगरदऱ्या आणि गर्द झाडीने वेढला आहे.

लोणावळा, महाराष्ट्र:

मुंबई - पुणे द्रुतगती मार्गावर असणारे लोणावळा हे शहर पावसाळी पर्यटनाचे केंद्र म्हणावे लागेल. मुंबई आणि पुणे या शहरात राहणाऱ्या लोकांसाठी पावसाळयात ही अत्यंत मोक्याची जागा आहे. जवळच माथेरान हे हील स्टेशन देखील आहे. या भागातले भुशी धरण विशेष प्रसिद्ध आहे. राहण्यासाठी हॉटेलची व्यवस्था पाहायला मिळते.

आनंद लुटा, पण काळजी घ्या:

पावसाळ्यात काही ठिकाणी ढगफुटी, पुर अशा घटना घडत असतात. अशावेळी प्रवास करताना आपण विशेष काळजी घ्यावी. त्याचबरोबर डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. अशावेळी काळजी घ्यावी. धबधबा पाहताना सुरक्षित अंतर ठेवावे. खोल पाण्यात जाणे टाळावे. त्याच्या बरोबर काही ठिकाणी हॉटेल चालक आर्थिक फसवणूक करतात त्यापासून स्वतःचा बचाव करा. आणि पावसाचा आनंद लुटा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+