'रिल्स'चा नाद जीवावर बेतला: ट्रेनला डोके धडकले अन् कवटीच बाहेर पडली; थरकाप उडवणारा Video व्हायरल
Train reels accident viral video : "जेव्हा माणसावर विनाश येतो तेव्हा त्याचा विवेक प्रथम मरतो." सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला एक थरकाप उडवणारा व्हिडिओ पाहून तुम्हाला या वचनाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
'लाईक्स' आणि 'कमेंट्स'च्या भुकेमुळे एका युवकाला काही क्षणात आपला जीव गमवावा लागला. रेल्वेच्या रुळांवर धोकादायक पद्धतीने रील बनवण्याच्या प्रयत्नात या मुलाचा मृत्यू झाला आहे. ही घटना कुठल्या स्टेशनलगत घडली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु, त्या घटनेचा व्हिडिओ इतका खतरनाक आहे की, त्यामुळे काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.

धोक्याचा अंदाज न घेतल्याने भीषण दुर्घटना
हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरत आहे, ज्यात काही युवक रेल्वे रुळांवर उभे राहून ट्रेन येण्याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. त्यांचा हेतू स्पष्ट होता: रील बनवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे आणि ती रील व्हायरल करणे.
ट्रेन जवळ येत असताना, इतर मुले रुळावरून खाली उतरतात, ज्यामुळे त्यांना वाटले की इंस्टाग्रामवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होईल. मात्र, त्यांना हे माहीत नव्हते की मृत्यू अगदी जवळ उभा आहे.
— Abyss of human stupidity (@KarmaCIip) October 4, 2025
डोके ट्रेनला धडकले अन् कवटीच बाहेर पडली!
मुले रुळांवर उभी असताना, वेगाने जाणारी ट्रेन फ्रेममध्ये दिसते. याच दरम्यान, एका मुलाने रीलच्या हव्यासाने किंवा हुशारीने अगदी अनवधानाने ट्रेनच्या अगदी जवळ उभे राहण्याची चूक केली.
वेगाने जाणाऱ्या ट्रेनला त्याचे डोके इतक्या जोरात धडकले की त्याचा जागीच मृत्यू झाला. काही अहवालांनुसार, या भीषण धडकेमुळे त्याच्या डोक्याची कवटी फुटली आणि तो जागेवरच कोसळला.
रील्ससाठी जीव धोक्यात घालणे किती महागात पडले!
हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यावर क्षणभराची मस्ती आणि रील्सची हाव किती महागात पडू शकते, याचा अत्यंत वेदनादायक प्रत्यय येतो.
सोशल मीडियावरील 'फेम'च्या या शर्यतीत अनेक तरुण जीवघेणे स्टंट करत आहेत. पालकांनी तसेच प्रशासनाने यावर गंभीर लक्ष देणे गरजेचे आहे.
रेल्वे रुळ किंवा इतर धोकादायक ठिकाणी रिल्स बनवणे हे कायद्याने गुन्हा तर आहेच, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे ते जीवघेणे आहे. लाईक्स आणि कमेंट्ससाठी तुमचा किंवा तुमच्या मित्राचा जीव धोक्यात घालणे, हे अज्ञानाचे आणि अविवेकाचे टोक आहे.












Click it and Unblock the Notifications