Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बाईचा नादच खुळा..! नवऱ्याला संगमात घातली ऑनलाईन आंघोळ, महाकुंभातील लोकही थक्क, VIDEO व्हायरल

Prayagraj Viral Video : प्रयागराज येथील महाकुंभाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर या सोहळ्याची सांगता होणार आहे. तर या ठिकाणी आज व उद्या दर्शनाासाठी लाखो भाविक हजेरी लावणार आहेत. अशातच, मंगळवारी महाकुंभातील एक जबदरदस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये एका महिलेने तिच्या पतीचे पाप संगमान धुतले तेही ऑनलाईन पद्धतीने. नेमकं काय घडलं असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, चला तर जाणून घेऊया व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसतेय.

प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात आतापर्यंत कोट्यावधी लोकांनी त्रिवेणी संगमावर स्नान केलं. अजूनही इथे स्नान करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी आहे. जे लोक महाकुंभमध्ये जाऊ शकले नाहीत ते तिथून आणलेलं पवित्र पाणी अंगावर शिंपडून किंवा आंघोळीच्या पाण्यात टाकून पवित्र स्नान करत आहेत. मात्र, व्हायरल झालेल्या व्हिडिओमधील महिनेले तर सर्व सीमाच ओलांडल्या. या महिलेनं जे केलं ते बघून तुम्हीही कपाळावर हात मारून घेतल्याशिवाय राहणार नाही.

Mahakumbh 2025

व्हायरल व्हिडिओ नेमकं काय दिसते?

प्रयागराज येथील संगमातील एक व्हिडिओ आज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत असलेली महिला त्रिवेणी संगमावर स्नान करण्यासाठी गेली होती. मात्र, तिचा पती काही कारणानं तिच्यासोबत येऊ शकला नाही. अशात महिलेनं पतीला 'ऑनलाईन आंघोळ' घातली. जे बघून लोकांनी डोक्यालाच हात लावून घेतलाय.

मोबाईल पाण्यात तीनदा बुडवती

इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, महिला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून पतीसोबत बोलत आहे. यादरम्यान ती बोलता बोलता फोन नदीच्या पाण्यात बुडवते आणि बाहेर काढते. फोन पाण्यात काही वेळा बुडवत असताना पती व्हिडीओ कॉलवर दिसत आहे. आता या व्हिडिओला लोक आता खरपूस समाचार घेऊ लागले आहेत.

व्हिडिओवर कमेंट, काहींनी उडवली खिल्ली

महिलेचा हा कारनामा पाहून बघता बघता व्हिडीओ व्हायरल झालाय. तर लोक या व्हिडिओवर अनेक मजेदार कमेंट्स करत आहे. एकानं लिहिलं की, "अरे भावांनो कुणी महाकुंभमध्ये गेलं असेल तर सांगा, मलाही असेच पाप धुवायचे आहेत". तर दुसऱ्यानं लिहिलं की, "ही काहीतरी नवीन पद्धत आहे पाप धुण्याची". तिसऱ्यानं लिहिलं की, "खूप खूप शुभेच्छा तुमचे सगळे पाप धुतल्या गेले".

दरम्यान, काही दिवसांआधी महाकुंभमध्ये 'डिजिटल स्नान' करवून देणाऱ्या एका व्यक्तीची चर्चाही रंगली होती. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत एक व्यक्ती 'डिजिटल स्नान' करवून देत असल्याचा दावा केला होता. व्यक्तीचा दावा होता की, अकराशे रूपये घेऊन लोकांना डिजिटल स्नान करवून देत होता. ही व्यक्ती व्हॉट्सअॅपद्वारे लोकांनी काढलेल्या फोटोंची प्रिंट काढत होती आणि पाण्यात त्यांना बुडवून लोकांचे पाप धुवत होती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+