नाही का अजबच! 10वीत मुलगा फेल झाला तर आई-वडिलांकडून केक कापून आनंद साजरा;व्हिडिओ झाला व्हायरल!
Viral Video : कर्नाटकातील बागलकोटमध्ये एका दाम्पत्याने अजबच कृती केली. ती घटना अजब यासाठी आहे की, एकीकडे त्यांचा मुलगा दहावीच्या परीक्षेत फेल झाला आहे. घरात थोडं नाराजी अन् दु:खाचे वातावरण असेल आपल्या सर्वांना वाटेल. पण, त्या मुलाच्या आई-वडिलांनी मुलाच्या अपयशाला देखील आनंदात स्वीकारून जल्लोष साजरा केला. घरी केक कापून त्यांनी त्याला खाऊ घातला अन् पुढील काळात पुन्हा प्रयत्न करं, असे आवाहन केले. सदर आई-वडिलांचा व मुलाचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत माहिती समोर आलेली आहे. त्यानुसार, कर्नाटकातील बागलकोट येथील बसवेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी अभिषेक चोलचगुड्डा दहावीच्या बोर्ड परीक्षेत नापास झाला. त्याला 600 पैकी फक्त 200 गुण मिळाले आणि तो सहाच्या सहा विषयांत फेल झाला.
त्यामुळे त्याचे मित्र परिवार व नातेवाईकाची त्याची चेष्टा करायला लागले. परंतु, त्याच्या आई वडिलांनी त्याच्या नापास झालेल्या घटनेला देखील मोठ्या आनंदाने स्वीकारले आहे. मुलाला फटकारण्याऐवजी किंवा त्याला रागविण्याऐवजी त्यांनी थेट मुलाच्या हातून केक कापला आणि पुढील वर्षी पुन्हा तयारी कर असे आश्वासन देऊन त्याला धीर दिला.
VIDEO | Karnataka: Parents celebrate their son after he fails in Class 10 exam by cutting a cake to boost his morale in Bagalkote. He got 200 marks out of 600, which is 32 percent, below the passing marks. #Karnataka #Bagalkote pic.twitter.com/YJzSBm3Gvq
— Press Trust of India (@PTI_News) May 5, 2025
लोक करू लागले पालकांचे कौतुक!
आता या अनोख्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर पालकांचे कौतुक करत लोक म्हणत आहेत की, या छोट्याशा सेलिब्रेशनने मोठा संदेश दिला. अपयश हा शेवट नसून, एका नवीन गोष्टीच्या सुरुवातीची तयारी आहे. आजच्या स्पर्धात्मक वातावरणात गुणांनाच सर्वस्व मानणाऱ्या पालकांसाठी ही घटना एक धडा ठरू शिकवून जातेय.
लोकांनीही त्यांचे अनुभव केले शेअर!
त्याच वेळी, व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर लोक सोशल मीडियावर अशाच प्रकारच्या कथा शेअर करू लागले आहेत. सुखेंद्र मेघवाल नावाच्या एका युझर्सने लिहिले की, 'लहानपणी माझा मित्र तिसऱ्या वर्गात नापास झाला होता, नंतर त्याने गव्हाच्या गुळाची पार्टी दिली, ते दिवस अजूनही स्मरणात आहेत.' जय-पराजय होतात, आपले मनोबल खचू देऊ नका.
मुलाने आता पालकांची इच्छा पूर्ण करावी
तर एका दुसऱ्या युझर्सने लिहिले की, हे त्या सर्व लोकांच्या तोंडावर एक चपराक आहे, जे म्हणतात की पालक त्यांना साथ देत नाहीत.' आशा आहे की, हा मुलगा आता पूर्ण समर्पणाने आणि कठोर परिश्रमाने अभ्यास करेल आणि आपल्या पालकांचे नाव उंचावेल. पण आपण हे देखील समजून घेतले पाहिजे की उत्सव हा आनंदाचा विषय नाही; आपल्या मुलांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.












Click it and Unblock the Notifications