Viral Video :माकडाप्रमाणे डोंगरावर सरसर चढणारी 'स्पायडर वुमन' पाहिला का?, व्हिडिओ पाहून बसेल धक्का!
Viral Video, Sprider Woman Video : आजकाल चालत जाणे तर लोक विसरले आहेत, एव्हाना पायी जाणं म्हणजे हल्ली प्रत्येकाच्या जीव्हारी लागते. कोणाला तर अंगावर काटा येतो तर काही जणांची तब्येतच बिघडते. पण अशातच एक महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जी महिला जसे की एका माकडाप्रमाणे सरसर डोंगर चढून गेली. व्हायरल व्हिडिओतील महिलेला लोक आता स्पायडर महिला असे म्हणून लागले आहेत. चला तर त्या व्हायरल व्हिडिओविषयी जाणून घेऊया..!
मुळात डोंगर चढणे, पायी चालणे हे हल्ली नव्या पिढीला जमत नाही किंवा आवडत देखील नाही. पण सध्या असा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामुळे सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला आहे. यामध्ये एक महिला कोणत्याही आधाराशिवाय उंचच्या उंच डोंगल चढत आहे. विशेष म्हणजे डोंगर चढणारी महिला ही सलवार-कमीजवर होती. तिला कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे कवच नव्हते. तरी देखील एका स्पायडर मन सारखी ती डोंगर चढत असल्याची दिसून आली आहे. डोंगर चढताना ती जणू रस्त्यावरुन चालत आहे, अशी दिसली.

डोंगर चढणारी स्पायडर वुमन
लक्ष वेधून घेणाऱ्या व्हिडिओमध्ये, तुम्ही पाहू शकता की महिलेला डोंगराची उंच चढाई चढता येईल का असे आव्हान मिळाले होते. तिने विलंब न करता आव्हान स्वीकारले. मग काही वेळातच ती डोंगराच्या खालच्या तळापासून थेट डोंगराच्या माथ्यावर पोहोचली. या दरम्यान, तिला कोणताही थकवा जाणवला नाही आणि तिने कोणत्याही गोष्टीचा आधारही घेतला नाही. तिला पाहून असं वाटतं की ती 'स्पायडर वुमन' आहे. व्हिडिओमध्ये दुसरी मुलगी तिला विचारते की तिला कसं वाटतंय. ती हसते आणि म्हणते, 'खूप छान वाटतंय.' या व्हिडिओने इंटरनेटवर लोकांची मने जिंकली आहे.
Meet Pooja, an Instagram influencer from Himachal! Look how easily she climbs a steep slope without any equipment. This isn’t just about her — it shows how strong women in India are, especially those from pahadi and rural areas. pic.twitter.com/wEVLcXyBJ6
— Nikhil saini (@iNikhilsaini) May 29, 2025
स्पायडर वुमन म्हणून लोकांनी दिली उपमा
या महिलेचे नाव पूजा असे सांगितले जात आहे, ती हिमाचलची आहे. तिचा हा अद्भुत व्हिडिओ सोशल मीडिया X व्हायरल झाला आहे. यात X वापरकर्ता निखिल सैनीने शेअर हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे. यासोबतच कॅप्शनमध्ये लिहिले आहे: "हिमाचलची इंस्टाग्राम इन्फ्लुएंसर पूजाला भेटा. ती कोणत्याही उपकरण तसेच कोणत्याही आधाराविना किती सहजपणे उंच टेकडी चढते ते पहा.
व्हायरल व्हिडिओतून एक गोष्ट सिद्ध होते की, भारतात महिला किती मजबूत आहेत. विशेषतः डोंगराळ आणि ग्रामीण भागातील महिला. महिलेचा हा पराक्रम पाहून लोकही आश्चर्यचकित झाले आहेत आणि तिला 'स्पायडर वुमन' म्हणून उपमा देऊ लागले आहेत.












Click it and Unblock the Notifications