महाकुंभात व्हायरल झालेल्या आयआयटीयन बाबांचा हा होता ऑल इंडिया रँक, वार्षिक पॅकेज ऐकूण बसेल धक्का
MahaKumbh Mela 2025 : प्रयागराज महाकुंभ 2025 मध्ये "आयआयटी वाले बाबा" म्हणून प्रसिद्ध असलेल्या अभय सिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळवलेल्या अभय सिंग यांनी शांतीच्या शोधात संसारिक जीवन सोडले आणि भिक्षूचे जीवन स्वीकारल आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये बाबांनी त्यांचा प्रवास शेअर केला आहे. बाबांनी सांगितले की, त्यांचे ध्येय आध्यात्मिक शांती प्राप्त करणे आणि लोकांना आध्यात्मिक मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करणं आहे. महाकुंभातील लाखो भाविक त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी उत्सुक आहेत.

आयआयटीची पार्श्वभूमी असल्यामुळे त्याची एक वेगळी ओळख आणि सखोल ज्ञानाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आज अध्यात्माचा मार्ग स्वीकारणारे अभय सिंग एकेकाळी परदेशात काम करून लाखो रुपये कमवत होते.
2008 मध्ये आयआयटीमध्ये निवड झालेल्या अभय सिंगचा जन्म हरियाणाच्या झज्जर जिल्ह्यात झाला आहे. आयआयटी वाले बाबांनी आपल्या मुळ गावी आपले सुरुवातीचे शिक्षण पूर्ण केलं. बारावीनंतर त्यांना आयआयटी जेईई परीक्षेची माहिती मिळाली आणि त्यासाठी बाबांनी दिल्लीत कोचिंग जॉईंन केलं. त्याच्या कठोर परिश्रमामुळे त्यांनी 2008 मध्ये आयआयटी जेईईमध्ये ऑल इंडिया रँक (एआयआर) 731 मिळवला. यानंतर अभयला आयआयटी बॉम्बेमध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग (2008-2012) बॅचमध्ये प्रवेश मिळाला. या यशाने त्याच्या आयुष्याची दिशा निश्चित केली आणि त्याच्या प्रतिभेला नवीन उंचीवर नेले.
विज्ञान सोडून त्यांनी अध्यात्माचा मार्ग निवडला
बाबांनी एका मुलाखतीत सांगितले की, जेव्हा त्यांनी जीवनातील गहन प्रश्नांची उत्तरे शोधायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. त्यांनी तत्वज्ञान, सॉक्रेटिस, प्लेटो आणि उत्तर आधुनिकतावाद यासारख्या विषयांवर सखोल अभ्यास केला. या अभ्यासामुळे त्यांना हे जाणवले की जीवनात खरा आनंद आणि शांती केवळ अध्यात्मातच आहे.
वार्षिक पॅकेज 36 लाख रुपये
आयआयटी बॉम्बेमधून पदवी घेतल्यानंतर अभय सिंग यांनी डिझाइनमध्ये मास्टर्स (एम.डेस) पदवी पूर्ण केली. उच्च शिक्षणानंतर त्यांनी काही काळ छायाचित्रण क्षेत्रात काम केले. यानंतर त्यांनी कॅनडामध्ये नोकरी केली. त्याठिकाणी त्यांनी तीन वर्षे काम केल्यानंतर त्याचे वार्षिक पॅकेज 36 लाख रुपये होते. आपल्या कारकिर्दीत यशस्वी होऊनही अभय यांनी आध्यात्मिक शांतीच्या शोधात हे सर्व सोडून एका भिक्षूचे जीवन स्वीकारले, जे आज महाकुंभात चर्चेचा विषय आहे.












Click it and Unblock the Notifications