विनेश फोगट, बजरंग पुनियाचा काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश, महिला कुस्तीपटू निवडणुकीच्या रिंगणात?
Vinesh Phogat Bajrang Punia : कुस्तीपटू विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या 30 दिवस अगोदर शुक्रवारी 6 सप्टेंबर रोजी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. विनेश जुलाना मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर 11 सप्टेंबर रोजी त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षामधील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले. नवी दिल्लीतील पक्ष मुख्यालयात दोघांचाही प्रवेश करत कॉंग्रेसचे सदस्यत्व स्वीकारले आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यापूर्वी विनेश फोगाट यांनी रेल्वे विभागातील पदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विनेश आणि पुनियासोबतचा एक फोटो शेअर करत 'चक दे इंडिया, चक दे हरियाणा' असे लिहिले आहे. जगात भारताला गौरव मिळवून देणारे आमचे प्रतिभावान चॅम्पियन विनेश फोगाट आणि बजरंग पुनिया यांची भेट. तुम्हा दोघांचा आम्हाला अभिमान आहे, असेही ते म्हणाले.

हरियाणा कॉंग्रेसच्या वतीने दोघांचे स्वागत
पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमप्रसंगी हरियाणा काँग्रेसचे अध्यक्ष उदय भान म्हणाले, आज विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी संपूर्ण जगात भारताची शान अन् मान वाढवली आहे. हरियाणा काँग्रेस कमिटीच्या वतीने मी तुम्हा दोघांचे मनःपूर्वक स्वागत करतो. काही दिवसांपासून दोन्ही कुस्तीपटू काँग्रेसमध्ये सामील होतील अशी अटकळ होती. यापूर्वी विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनीही राहुल गांधी यांची भेट घेतली होती.
#WATCH | Delhi: Vinesh Phogat and Bajrang Punia join the Congress party
— ANI (@ANI) September 6, 2024
Party's general secretary KC Venugopal, party leader Pawan Khera, Haryana Congress chief Udai Bhan and AICC in-charge of Haryana, Deepak Babaria present at the joining. pic.twitter.com/BrqEFtJCKn
11 सप्टेंबरला विनेश उमेदवारी अर्ज दाखल करणार?
विनेश फोगाट यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार विनेश फोगटही विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. विनेश फोगटचे तिकीट जिंद किंवा दादरीच्या जुलाना येथून दिले जाऊ शकते. विनेश फोगट 11 सप्टेंबर रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. बजरंग पुनिया यांना बदलीमधून तिकीटावर निवडणूक लढवायची आहे. पण काँग्रेस त्यांना ही जागा देऊ इच्छित नाही. बदली येथील विद्यमान आमदार कुलदीप वत्स यांचे तिकीट रद्द करण्यास काँग्रेसने नकार दिला आहे. बदलीऐवजी जाटबहुल मतदारसंघातून बजरंग पुनिया यांना उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.
तर काही माध्यमांनी दावा केला आहे की, बजरंग पुनिया हे निवडणूक लढवणार नाहीत. तर त्यांच्याकडे पक्षाच्या प्रचाराची व निवडणुकीची अंतर्गत जबाबदारी दिली जाऊ शकते. दरम्यान, विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी 4 सप्टेंबर रोजी राहुल गांधी यांची भेट घेतली होती. राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांचीही भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या काँग्रेस प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
भारतीय रेलवे की सेवा मेरे जीवन का एक यादगार और गौरवपूर्ण समय रहा है।
— Vinesh Phogat (@Phogat_Vinesh) September 6, 2024
जीवन के इस मोड़ पर मैंने स्वयं को रेलवे सेवा से पृथक करने का निर्णय लेते हुए अपना त्यागपत्र भारतीय रेलवे के सक्षम अधिकारियों को सौप दिया है। राष्ट्र की सेवा में रेलवे द्वारा मुझे दिये गये इस अवसर के लिए मैं… pic.twitter.com/HasXLH5vBP
विनेशने रेल्वेच्या नोकरीचा राजीनामा दिला
विनेश फोगट यांनी भारतीय रेल्वेमधील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडिया पोस्टवर माहिती देताना विनेश फोगटने लिहिले की, "भारतीय रेल्वेची सेवा हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय आणि अभिमानाचा काळ आहे. माझ्या आयुष्याच्या या वळणावर, मी रेल्वे सेवेपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे आणि भारतीय रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांकडे माझे राजीनामा पत्र सादर केले आहे. देशाच्या सेवेत रेल्वेने मला दिलेल्या या संधीबद्दल मी भारतीय रेल्वे परिवाराचा सदैव ऋणी राहीन.
-
Devendra Fadnavis : गॅस टंचाईची भीती हा काँग्रेसचा कुटील डाव; देवेंद्र फडणवीसांचा घणाघाती आरोप -
Horoscope Today March 13 2026 : 'या' राशींच्या आयुष्यात आर्थिक लाभ अन् खास बदल, वाचा आजचे राशीभविष्य -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
29 वर्षांपूर्वीची दुखापत अन् सक्तीची विश्रांती; केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवर शस्त्रक्रिया! -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास










Click it and Unblock the Notifications