कंगना राणावतने माफी मागावी, अन्यथा FIR.. सोनिया गांधींवरील वादग्रस्त वक्तव्यावर कुणी दिला इशारा?वाचा
Vikramaditya's warning Kangana Ranaut : बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि खासदार कंगना राणावत हिने काँग्रेसच्या प्रमुख नेत्या सोनिया गांधीवर प्रखर टीका केली. आता या टीकेवरुन हिमाचल प्रदेशात रणकंदन माजलं असून त्यानंतर कंगना राणावतने माफी मागावी अन्यथा गुन्हा दाखल करुन असा इशारा काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी दिला आहे.
कंगना राणावत यांनी आपले आरोप मागे घ्यावे अन्यथा मानहानीच्या खटल्याला सामोरे जावे असा त्यांनी इशारा दिला. यामुळे आता कंगनाविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे.

काय म्हणाले मंत्री विक्रमादित्यसिंह
दरम्यान, मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले की, कंगना राणावत निरर्थक विधान करते, ती मानसिक दिवाळखोरीची बळी आहे. कंगना राणावतने तिच्या वक्तव्याशी संबंधित तथ्य उघड करावे. त्या संबंधित तथ्ये मांडू शकत नसतील तर त्यांनी सोनिया गांधींची माफी मागावी असेही त्यांनी म्हटले आहे.
..तर मानहाणीचा दावा दाखल करु
विक्रमादित्य सिंगने कंगना राणावतला आव्हान देत एक रुपयाच्याही हेरा फेरीची वस्तुस्थिती दाखवण्यास सांगितले. जर कंगना रणावतने सोनिया गांधींची माफी मागितली नाही, तर मी तिच्यावर मानहानीचा दावा दाखल करेल असे ते म्हणाले. विक्रमादित्य सिंह म्हणाले की, सेन्सॉर बोर्डाने कंगना राणावतचा चित्रपट रोखला आहे, त्यामुळेच ती सध्या घरी आली आहे आणि घरी बसून काहीही वक्तव्ये करत आहे.
भारतीय जनता पक्षाची खासदार कंगना राणावत हिने काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने सोनिया गांधींना आपत्ती निवारण निधीचा गैरवापर केला असा आरोप केला आहे. सिंह यांनी कठोर शब्दात या आरोपावर उत्तर दिले, राणावत यांनी त्यांचे दावे सिद्ध करावे किंवा सोनिया गांधींची माफी मागावी, असे आव्हान दिले आणि आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांनी घोषणा केली आहे की हिमाचल प्रदेशच्या आर्थिक आव्हानांमुळे ते आणि त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी दोन महिन्यांचे पगार घेणार नाहीत. राजकीय गोंधळाव्यतिरिक्त, राणावत 1975 मध्ये इंदिरा गांधींच्या पंतप्रधान असतानाच्या राजकीय अशांततेवर आधारित असलेल्या तिच्या नवीन चित्रपट 'इमर्जन्सी'शी संबंधित कायदेशीर आव्हानांचाही सामना करत आहेत. या चित्रपटाला शीख संघटनांच्या विरोधाला सामोरे जावे लागले असून सध्या मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर कारवाईसंदरभातील प्रकरण सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications