'छावा' पाहिला अन् मुघलांनी जिथे खजिना लपवला होता तिथे खोदकामासाठी स्थानिक पोहोचले, पाहा- व्हिडिओ!
सद्यस्थितीत छावा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अशातच हा चित्रपट पाहून आल्यानंतर एका गावात वेगळीच अफवा पसरली. ज्या ठिकाणी मुघलांनी खजिना लपवून ठेवला, त्या ठिकाणची खोदणी करण्यासाठी अख्ख गावंच रात्रभर त्या जागेवर खोदकाम करत होते. किर्र अंधार होता तरी देखील लोक मशाली घेऊन तर कोणी मोबाईलची बॅटरी लावून खोदकाम करत होते, या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
असीरगड गावातील व्हिडिओ व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील बुरहानपूर जिल्ह्यातील असीरगड गावात शेतात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याची अफवा पसरली. या अफवेनंतर महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुले यांच्यासह शेकडो लोक मशाल आणि आधुनिक उपकरणे घेऊन शेतात खोदण्यासाठी रात्री शेतात पोहोचले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यापूर्वीही याच परिसरात अशी नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या, आता पुन्हा या अफवेचा पेव सुटल्याने मोठा गोंधळ उडाला आहे.

ऐतिहासिक खजिना पुरल्याची लोकांची धारणा
असीरगडमध्ये ऐतिहासिक खजिना असल्याची धारणा स्थानिकांची आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, लोक लांबून खोदण्यासाठी येत होते आणि काहींच्या हाती आधुनिक उपकरणेही होती. असे मानले जाते की प्राचीन काळी सैनिक आणि लोक त्यांच्या मौल्यवान वस्तू जमिनीत गाडून ठेवत असत. चौपदरी रस्ता तयार करताना काढलेली माती शेतात टाकण्यात आली, त्यानंतर काही महिलांना खोदकाम करताना नाणी सापडली होती. त्यामुळे या भागातील लोक या ठिकाणी खोदकाम करण्यासाठी रात्री बे रात्री जाऊ लागले आहेत.
खजिन्याच्या शोधात रात्रभर खोदकाम
असीरगड गावात पसरलेल्या या अफवेमुळे खजिन्याच्या शोधात लोकांना रात्रभर खोदकाम करावे लागले. याआधीही याच परिसरात मुघलकालीन सोन्याची नाणी सापडल्याच्या बातम्या आल्या होत्या. शेकडो लोक रात्रीच्या अंधारात टॉर्चच्या उजेडात खोदताना दिसतात. यामध्ये महिला, पुरुष, वृद्ध आणि लहान मुलांचा समावेश आहे.
मुघल सैनिकांची होती या ठिकाणी छावणी
असीरगड हे ऐतिहासिक शहर होते, त्याची लोकसंख्या 7 लाख ते 8 लाख होती. आणि जवळच एक गाव आहे, सराई, इथे लष्करी छावण्या आणि घोड्यांचे तबेले होते. जेव्हा सैनिक आणि सुभेदार युद्धानंतर परत आले, तेव्हा ते बहुतेकदा लुटलेला माल शेतात लपवून ठेवत किंवा जमिनीत खड्डे खोदून ठेवत. लोक लूटमारीच्या भीतीने जमिनीत खड्डा खणून आपला खजिना लपवून ठेवत होते. जेणेकरून तो सुरक्षित राहील. यामुळे लोकांना यापूर्वी अनेकदा सोन्याची नाणी मिळाली आहेत.
#Chhava movie showed that Mughals looted Gold and treasure from Marathas and kept it in the Asirgarh Fort, Burhanpur, MP.
— Roshan Rai (@RoshanKrRaii) March 7, 2025
After watching the movie, locals flocked to the spot with digging tools, metal detectors and bags to dig up the treasure and take it home.
My heart bleeds… pic.twitter.com/zUiGyMoQKh












Click it and Unblock the Notifications