Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ठरलं! उपराष्ट्रपती निवडणूक बिनविरोध नाहीच; सी.पी. राधाकृष्णन VS बी सुदर्शन रेड्डी यांच्यात लढत!

B Sudarshan Reddy Vs CP Radhakrishnan : भारतीय राजकारणात एक महत्त्वपूर्ण घडामोड आज पाहायला मिळत आहे. येत्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने आपले उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे.

काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर लगेचच मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेऊन उमेदवाराचे नाव जाहीर केले.

या निवडणुकीत न्यायमूर्ती रेड्डी यांचा सामना सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांच्यासोबत होणार आहे. या उमेदवारीमुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक आणखी रोमांचक होण्याची चिन्हे आहेत. तर बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून भाजपच्या आवाहनला विरोधकांनी नकार दिला आहे.

B Sudarshan Reddy Against NDA CP Radhakrishnan

कोण आहेत निवृत्त न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी? (Who is B Sudarshan Reddy)

  • बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी झाला. कायद्याचे शिक्षण घेऊन त्यांनी बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय दिले आहेत.
  • २ मे १९९५: आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
  • ५ डिसेंबर २००५: गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित कायदेशीर कारकिर्दीमुळे त्यांना अनेकदा न्यायाचे आणि कायद्याचे कट्टर समर्थक मानले जाते. विरोधी पक्षांनी एका निवृत्त न्यायाधीशाला उमेदवारी देऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

खरगेंच्या घरी रात्री उशीरापर्यंत सुरू होत्या बैठका!

या घोषणेपूर्वी सोमवारी संध्याकाळी विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती. या बैठकीत उपराष्ट्रपतीपदासाठीच्या संभाव्य उमेदवारांवर चर्चा झाली.

काही नावे सुचवण्यात आली, ज्यात तामिळनाडूतील नेत्यांचाही समावेश होता. मात्र, शेवटी बी. सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमत झाले. ही उमेदवारी केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून, ती विरोधी पक्षांची एक रणनीती असल्याचे दिसते.

या निवडीमुळे, 'आय.एन.डी.आय.' आघाडी न्यायाचे महत्त्व आणि निष्पक्षता यांसारख्या मुद्द्यांवर भर देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आता ही निवडणूक कोणत्या दिशेने जाते आणि जनता याचा कसा स्वीकार करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+