Valentine Week 2025: 7 फेब्रुवारीपासून प्रेमाचा आठवडा, प्रेमाविषयी सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या
Valentine Week Full List 2025: व्हॅलेंटाईन डे हा जगभरात प्रेमासाठी सर्वात खास दिवस मानला जातो. दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणारा हा दिवस आपलं प्रेम व्यक्त करण्याची एक सुंदर संधी देतो. पण त्याआधी 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी असा संपूर्ण आठवडाभरात प्रेम दिवस साजरे केला जातात. ज्याला व्हॅलेंटाईन वीक असं म्हणतात. या आठवड्यातील प्रत्येक दिवसाचे एक खास महत्त्व आहे.

2025 च्या व्हॅलेंटाईन वीकची संपूर्ण यादी
7 फेब्रुवारी - गुलाब दिवस (शुक्रवार): या दिवशी प्रेमी गुलाबांची देवाणघेवाण करतात. लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे, तर पिवळे गुलाब मैत्री आणि नवीन सुरुवात दर्शवतात.
8 फेब्रुवारी - प्रपोज डे (शनिवार): हा दिवस तुमच्या क्रशला किंवा प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्याची सर्वोत्तम संधी आहे.
9 फेब्रुवारी - चॉकलेट डे (रविवार): नातेसंबंधांमध्ये गोडवा आणण्यासाठी चॉकलेट हा सर्वोत्तम मार्ग आहे. या दिवशी लोक त्यांच्या जोडीदारांना चॉकलेट भेट देतात.
10 फेब्रुवारी - टेडी डे (सोमवार): टेडी बेअर हे प्रेम आणि आपुलकीचे प्रतीक आहे. हा दिवस तुमच्या प्रिय व्यक्तीला टेडी भेट देऊन साजरा केला जातो.
11 फेब्रुवारी - प्रॉमिस डे (मंगळवार): या दिवशी प्रेमी एकमेकांना वचन देतात, ज्यामुळे त्यांचे नाते मजबूत होते.
12 फेब्रुवारी - हग डे (बुधवार): मिठी मारणे हा प्रेम आणि आपुलकी दाखवण्याचा सर्वात सुंदर मार्ग आहे. हा दिवस प्रियजनांना मिठी मारून साजरा केला जातो.
13 फेब्रुवारी - किस डे (गुरुवार): किस हे प्रेम आणि जवळीकतेचे प्रतीक आहे. या दिवशी प्रेमी युगुल चुंबन घेऊन आपले प्रेम व्यक्त करतात.
14 फेब्रुवारी - व्हॅलेंटाईन डे (शुक्रवार): हा प्रेमाचा सर्वात खास दिवस असतो, जेव्हा लोक त्यांच्या प्रियजनांना खास भेटवस्तू आणि संदेश पाठवतात.
व्हॅलेंटाईन वीक असा बनवा खास
हा प्रेमाचा आठवडा खास बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला सुंदर गुलाब, चॉकलेट, सरप्राईज गिफ्ट्स, रोमँटिक डेट्स आणि प्रेमळ संदेश देऊ शकता. प्रेमसंबंध दृढ करण्यासाठी हा आठवडा उत्तम आहे. तर हा व्हॅलेंटाईन आठवडा तुमच्या प्रियजनांसोबत साजरा करा आणि प्रेम संस्मरणीय बनवा!












Click it and Unblock the Notifications