उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग येथे भीषण अपघात! अलकनंदा नदीत बस कोसळली, अनेक लोक बेपत्ता, मृत्यूची शक्यता
Uttarakhand Rudraprayag accident : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात आज 26 जून 2025 गुरुवारी, एक मोठा अपघात झाला. येथील घोलतीर परिसरात 18 आसनी बस अनियंत्रित होऊन अलकनंदा नदीत पडली. या अपघातात किमान एकाचा मृत्यू झाला आहे आणि सात जण जखमी झाले आहेत.
या घटनेनंतर उत्तराखंड पोलिस आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) ची पथके घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. आतापर्यंत सात जणांना वाचवण्यात यश आले आहे, तर अद्याप मृतांचा ठोस आकडा हाती आलेल्या नाही.

घोलतीर परिसरातील अलकनंदा नदीत हा अपघात झाला, पोलिस मुख्यालयाचे प्रवक्ते आणि आयजी नीलेश आनंद भरणे यांच्या मते, बस नियंत्रण सुटल्यानंतर थेट नदीत पडली. रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलतीर भागात हा अपघात झाला.
#WATCH | Uttarakhand | One person dead, seven injured after an 18-seater bus falls into the Alaknanda river in Gholthir of Rudraprayag district. Teamsof SDRF, Police and Administration conduct search and rescue oeprationd
— ANI (@ANI) June 26, 2025
Video source: Police pic.twitter.com/dgdznAc0ck
नदीत वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू
गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे म्हणाले की, पोलिस, एसडीआरएफ आणि प्रशासनाच्या पथके घटनास्थळी उपस्थित आहेत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. नदीत वाहून गेलेल्या लोकांचा शोध सुरू आहे.
मी स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे - मुख्यमंत्री धामी
जनपद रुद्रप्रयाग में एक टेंपो ट्रैवलर के नदी में गिरने का समाचार अत्यंत दुःखद है। SDRF सहित अन्य बचाव दलों द्वारा युद्ध स्तर पर राहत एवं बचाव कार्य किया जा रहा है।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) June 26, 2025
इस संबंध में निरंतर स्थानीय प्रशासन से संपर्क में हूं। ईश्वर से सभी के सकुशल होने की प्रार्थना करता हूं।
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी ट्विट करून अपघाताबद्दल दुःख व्यक्त केले आहे. मुख्यमंत्र्यांनी लिहिले की, 'रुद्रप्रयाग जिल्ह्यात एका टेम्पो ट्रॅव्हलर नदीत पडल्याची बातमी अत्यंत दुःखद आहे. एसडीआरएफ आणि इतर बचाव पथकांकडून युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. मी या प्रकरणाबाबत स्थानिक प्रशासनाशी सतत संपर्कात आहे. मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी देवाकडे प्रार्थना करतो.'
आताच हाती आलेल्या ताज्या माहितीनुसार, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील घोलथिर येथे 18 आसनी बस अलकनंदा नदीत कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहे तर सात जखमी झाल्याचे अधिकृतरित्या सांगण्यात आले आहे, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील काहींची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचेही सांगण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications