उत्तराखंडमधील चमोली येथे हिमस्खलन, 40 पेक्षा अधिक कामगार अडकले, सर्च ऑपरेशन सुरु
उत्तराखंडमधील चमोली येथे मुसळधार बर्फवृष्टीमुळे माना गावाजवळ हिमस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार माना गावाच्या वर झालेल्या या हिमस्खलनात 57 कामगार गाडले गेल्याची माहिती आहे. त्यापैकी 10 कामगारांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे.
घटनास्थळी मदतकार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, जिल्हा प्रशासन, आयटीबीपी आणि बीआरओच्या टीम घटनास्थळी आहेत. हे हिमस्खलन लोकवस्ती असलेल्या भागापासून किती अंतरावर आहे हे अद्याप कळलेले नाही.

गेल्या 24 तासांपासून उत्तराखंडच्या उंचावरील प्रदेशातील अनेक भागात बर्फवृष्टी होत आहे. तर सखल भागात पाऊस सुरूच आहे. केदारनाथ धाम, त्रियुगीनारायण, तुंगनाथ, चोपटा आणि इतर उंच भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. हवामान खात्याने डोंगराळ भागांसाठी अलर्ट जारी केला आहे. हवामान खात्याने उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. आयएमडीनुसार, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग आणि इतर जिल्ह्यांमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टीची परिस्थिती कायम राहील.
Uttarakhand | Police Headquarters spokesperson IG Nilesh Anand Bharne tells ANI, "A massive avalanche has occurred near the Border Roads Organisation camp in the border area of Mana in which 57 workers engaged in road construction have been trapped. Out of these workers, 10… pic.twitter.com/5A6e1V7ncQ
— ANI (@ANI) February 28, 2025
मिळालेल्या माहितीनुसार, हे कामगार रस्त्याच्या बांधकामासाठी एका खाजगी कंत्राटदारासोबत काम करत होते. गेल्या 48 तासांत या भागात झालेल्या मुसळधार बर्फवृष्टीमुळे हिमनदी नदीत फुटली. हिमनदीजवळील बांधकाम स्थळांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने परिसरातील रहिवाशांना अलर्ट केले आहे.
मुख्यमंत्री धामी यांनी टिट्ट करुन दिली माहीती
मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी चमोली अपघातावर लक्ष ठेवून आहेत. त्यांनी ट्विटरवर पोस्ट केले आणि म्हटले की, "चमोली जिल्ह्यातील माना गावाजवळ बीआरओकडून सुरू असलेल्या बांधकामादरम्यान अनेक कामगार हिमस्खलनाखाली दबल्याची दुःखद बातमी मिळाली. आयटीबीपी, बीआरओ आणि इतर बचाव पथकांकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. सर्व कामगार बांधवांच्या सुरक्षेसाठी मी भगवान बद्री विशालकडे प्रार्थना करतो.
जनपद चमोली में माणा गांव के निकट BRO द्वारा संचालित निर्माण कार्य के दौरान हिमस्खलन की वजह से कई मजदूरों के दबने का दुःखद समाचार प्राप्त हुआ।
— Pushkar Singh Dhami (@pushkardhami) February 28, 2025
ITBP, BRO और अन्य बचाव दलों द्वारा राहत एवं बचाव कार्य संचालित किया जा रहा है।
भगवान बदरी विशाल से सभी श्रमिक भाइयों के सुरक्षित होने की…
#WATCH | Uttarakhand CM Pushkar Singh Dhami says, "57 of the BRO workers were trapped in the avalanche, out of which 16 workers have been rescued. All preparations have been made. We are taking help from the ITBP. The district administration and all others are in touch, and we… https://t.co/DCJxI4ykQ9 pic.twitter.com/zayplFhsYv
— ANI (@ANI) February 28, 2025
-
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद -
ऑनलाइन फसवणुकीला बसणार लगाम! मेटाची 'अँटी-स्कॅम' ढाल; WhatsApp, FB व मेसेंजर आता सुरक्षित! -
LPG cylinder shortage : भारतात एलपीजी गॅसचा प्रचंड तुटवडा! सरकारचे मोठे आदेश, कुठे काय स्थिती जाणून









Click it and Unblock the Notifications