Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अक्षरधाम मंदीर:गिनिज बुकमध्ये नोंद झालेल्या 'या' मंदीराची वैशिष्ट्ये काय? जेडी वैन्स का भेट देताहेत?

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जेडी व्हान्स हे पत्नी उषा वैन्स व मुलांसह दिल्लीतील अक्षरधाम मंदिरात पोहोचले आहेत. उषा वैन्स या मुळच्या भारतीय वंशाच्या आहेत. हे दाम्पत्य दर्शनासाठी विमानतळावरून थेट मंदिरात पोहोचले. दर्शनानंतर हे दाम्पत्य मंदिरातील वास्तुकलाही पाहणार आहेत. उपराष्ट्रपतींच्या भेटीनंतर पुन्हा एकदा अक्षरधाम मंदीराची चर्चा सुरु झाली आहे. या मंदीराचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाँर्डमध्येही नोंदले गेलेले आहे. काय आहे या मंदीराची विशेषता? कसे आहे मंदीर? हेच आपण समजून घेऊयात...

JD Vance visits Akshardham

जगभरात आहे प्रसिद्ध

देशाची राजधानी दिल्ली येथे असलेले स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. दिल्लीला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांमध्येही ते खूप प्रसिद्ध आहे. हे मंदिर दिल्लीतील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. पूर्व दिल्लीतील अक्षरधाम मंदिर हे देशातील सर्वात मोठ्या हिंदू मंदिरांपैकी एक आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे सौंदर्य आणि भव्यता जे पाहणाऱ्या कोणालाही आश्चर्यचकित करेल. अक्षरधाम मंदिराचे नाव गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले आहे.

कोरीवकाम आहे अद्भूत

अक्षरधाम मंदिर हे १४१ फूट उंच, ३१६ फूट रुंद आणि ३५६ फूट लांब आहे. या मंदीरात फुले, प्राणी, पक्षी, नर्तक, संगीतकार आदींचे कोरिव काम केलेले आहे. मंदिरात २३४ सुशोभित खांब, ९ घुमट आणि २०,००० संत, अनुयायी आणि आचार्यांचे पुतळे आहेत. मंदिराच्या पायथ्याशी एक गजेंद्र पीठ आणि हत्तीला श्रद्धांजली वाहणारा एक स्तंभ देखील आहे. हिंदू साहित्य आणि संस्कृतीत याला खूप महत्त्व दिले जाते. यामध्ये १४८ मोठे हत्ती बनवण्यात आले आहेत ज्यांचे वजन अंदाजे ३,००० टन असेल. मंदिराच्या मध्यवर्ती घुमटाखाली अभयमुद्रेत बसलेली भगवान स्वामीनारायणांची ११ फूट उंच मूर्ती आहे.

गिनीज बुकमध्ये नाव

जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर संकुल असल्याने, स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचे नाव बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले गेले आहे. अक्षरधाम मंदिराच्या बांधकामात सुमारे ११,००० कारागिरांचे कष्ट आहेत. याच मंदीरात अमेरिकेचे उपराष्ट्रपती त्यांच्या कुटुंबासह दर्शनाला आले आहेत. या भेटीमुळे पुन्हा एकदा अक्षरधाम मंदीराची चर्चा सुरु झाली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+