हातकड्या घालून २०५ भारतीय अमेरिकेने परत पाठवले; विमान अमृतसरला आले, महाराष्ट्रतील किती होते..?
अमेरिकेत बेकायदेशिरपणे राहणाऱ्या लोकांविरोधात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कठोर भूमिका घेतली. सुमारे १८ हजार बेकायदेशिर भारतीयांची यादी त्यांनी तयार केली. त्यातील 205 भारतीयांना देशाबाहेर काढलंय. या सर्वाची ओळख पटली आहे. या सगळ्या लोकांना C-17 या अमेरिकी सैन्य विमानाने भारतात पाठवण्यात आले. या सर्वांना हातकड्या घालून विमानात बसवतानाचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. बुधवारी दुपारी पंजाबच्या अमृतसर येथील श्री गुरु रामदास जी आंतरराष्ट्रीय विमानतळावर C-17 लँड झाले.

सर्वात मोठी कारवाई
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतिसातील सर्वात मोठी हद्दपारी करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी कारवाई सुरु केली आहे. इमिग्रेशन आणि कस्टम एन्फोर्समेंटने १५ लाख अवैध स्थलांतरितांची यादी तयार केली. त्यात १८ हजार भारतीय आहेत. सर्वांना आपापल्या देशात पाठविण्याचे काम सुरु झाले आहे. आज त्यातील २०५ भारतीयांना अमृतसर येथे सोडण्यात आले. अमृतसर प्रशासनाशी संबंधित सूत्रांनी सांगितलं की, अमेरिकी विमानाने येणाऱ्या सर्व लोकांच्या कागदपत्रांची अमृतसर विमातळावर तपासणी करण्यात येईल. इमीग्रेशनशिवाय गुन्हेगारी रेकॉर्ड तपासला जाईल. गुन्हेगारी रेकॉर्ड आढळला, तर विमानतळावरच त्यांना ताब्यात घेण्यात येईल. या प्रक्रियेला पूर्ण दिवस लागू शकतो. सूत्रांनुसार अमेरिकेतून डिपोर्ट होणाऱ्या या भारतीयांमध्ये काही असे लोक सुद्धा असू शकतात, जे भारतात गुन्हा करुन अमेरिकेत पळून गेलेले असतील.
🇺🇸🇮🇳 US Military C-17 Aircraft Deports 200+ Indian Nationals from Texas
— RT_India (@RT_India_news) February 4, 2025
It's reported each military flight costs in excess of ,600 per migrant, based on data from another plane which went to Guatemala. pic.twitter.com/XTJKvjOMDq
महाराष्ट्रातील किती लोक आले?
अमृतसर इंटरनॅशनल एअरपोर्टवर सी-१७ दुपारी लँड होईल. या विमानात 205 भारतीय असल्याची पृष्टी करण्यात आली आहे. त्यात गुजरातचे 33, पंजाबचे 30, उत्तर प्रदेशचे 03, हरियाणाचे 33, चंदीगडचे 02 आणि महाराष्ट्रातले 03 लोक आहेत, अशी माहिती मिळत आहे. प्यू रिसर्च सेंटरच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत ७.२५ लाख अवैध भारतीय स्थलांतरीत आहेत. याबाबत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, अमेरिकेत किती बेकायदेशिर भारतीय आहेत व त्यांना परत पाठवता येईल की नाही, याची चौकशी सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications