पाकिस्तान्यांनो सांगा ट्रम्पंना शांततेचा नोबेल द्यायचा का? इराणवरील हल्ल्यानंतर ओवैसींचा सवाल, VIDEO
US Attacks Iran Asaduddin Owaisi's Question to Pakistan : इराणच्या अणू स्थळांवर अमेरिकेने हल्ला केल्यानंतर आता जगभरात पडसाद उमटत आहेत, या हल्ल्याने जगभरातील वातावरण अचानक बदलले असून मध्य-पूर्वमधील संघर्ष आणखी उफाळला आहे. याच धर्तीवर एमआयएमचे अध्यक्ष तथा खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही आपली संतप्त प्रतिक्रीया दिली आहे. पाकिस्तानच्या लोकांना आता विचारा की, डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळायला हवा का, असा सवाल त्यांनी विचारला.

इराणवर झालेल्या हल्ल्यानंतर असदुद्दीन ओवैसी यांनी पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांना टोला मारला असून यासाठीच डोनाल्ड ट्रम्पंसोबत जेवण केले होते का? असे म्हणत काही प्रश्न उपस्थित केले आहे.
नेमके काय म्हणाले असदुद्दीन ओवैसी?
एमआयएम पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, पाकिस्तानचे जनरल (लष्करप्रमुख असीम मुनीर) यांनी यासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत जेवण केले होते का? आज ते सर्व उघड झाले आहेत.." असदुद्दीन ओवैसी इराणच्या 3 अणुस्थळावर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांवर आणि इस्रायल आणि इराणमधील सुरू असलेल्या संघर्षावर म्हटले आहे.
#WATCH | Hyderabad | "...Did Pakistan's General (Army chief Asim Munir) have lunch with the US president for this? They all have been exposed today.., "says AIMIM chief Asaduddin Owaisi on the US strikes on Iran's 3 nuclear facilities and the ongoing conflict between Israel and… pic.twitter.com/rAwPK9YU1Z
— ANI (@ANI) June 22, 2025
1.6 कोटींहून अधिक भारतीयांवर परिणाम
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "आपण हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की 1.6 कोटींहून अधिक भारतीय आखाती आणि मध्य पूर्वेत राहतात आणि जर त्या भागात युद्ध झाले, तर त्याचा तेथे राहणाऱ्या भारतीयांवर दुर्दैवाने गंभीर परिणाम होईल. भारतीय कंपन्यांनी या सर्व अरब देशांमध्ये किंवा आखाती देशांमध्ये केलेली गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक या भागातून येते.
#WATCH | Hyderabad: On US strikes on Iran's three nuclear facilities, AIMIM MP Asaduddin Owaisi says, "We should ask Pakistanis if for this they want Trump to get a Nobel Peace Prize..."
— ANI (@ANI) June 22, 2025
"This attack by the US has helped Netanyahu, who is a butcher of Palestinians... A genocide… pic.twitter.com/rLSYMASqY4
खरंच इराणकडे अण्वस्त्र आहेत का?
इराणकडे अण्वस्त्रे आहेत याबद्दल हा गोंधळ निर्माण झाला आहे. ते अण्वस्त्रे इराकमध्येही वापरले गेले होते, सामूहिक विनाशाची शस्त्रे असे काहीही नाही, काहीही बाहेर आले नाही," असे असदुद्दीन ओवैसी म्हणाले.
इराणवर हल्ला हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन
असदुद्दीन ओवैसी म्हणाले, "इराणवर हल्ला हे आंतरराष्ट्रीय कायद्याचे आणि संयुक्त राष्ट्रांच्या चार्टरचे उल्लंघन आहे... असे केल्याने, मला खात्री आहे की येत्या पाच वर्षांत इराण एक अण्वस्त्रधारी राष्ट्र होईल. हल्ल्यापूर्वी इराणने कदाचित आपला साठा हलवला असेल. तो प्रतिबंधक ठरणार नाही. अनेक अरब देशांना वाटेल की त्यांना अण्वस्त्र क्षमतेची आवश्यकता आहे."
पाकिस्तानी लोकांना सांगावे, ट्रम्पंना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा का?
इराणच्या तीन अणुसुत्रांवर अमेरिकेच्या हल्ल्यांवर एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणतात, "आपण पाकिस्तानी लोकांना विचारले पाहिजे की यासाठी त्यांना ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळावा अशी इच्छा आहे का..? अमेरिकेच्या या हल्ल्यामुळे पॅलेस्टिनींचा कसाई असलेल्या नेतन्याहूला मदत झाली आहे का... गाझामध्ये नरसंहार होत आहे आणि अमेरिकेला त्याची चिंता नाही." असेही त्यांनी म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications