'शिक्षण हे वाघिणीचे चे दूध आहे, जो पिईल तो गर्जना करेल',आप'मध्ये प्रवेश करताच अवध ओझांची गर्जना
Avadh Ojha joined Aam Aadmi Party: देशातील सुप्रसिद्ध UPSC शिक्षक अवध ओझा यांनी आज 2 डिसेंबर 2024 रोजी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पार्टी (AAP) मध्ये प्रवेश केला आहे. अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतील शैक्षणिक क्रांतीमुळे प्रभावित होऊन अवध ओझा यांनी आम आदमी पक्षाचे सदस्यत्व घेतले असल्याचे आपने म्हटलं आहे.
आप पक्षात सामील होताच अवध ओझा यांनी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांनी शिक्षणाबाबत केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे. अवध ओझा म्हणाले, राजकारणात प्रवेश करून शिक्षणाच्या विकासासाठी काम करणे हेच माझे ध्येय आहे.

'शिक्षण हे वाघिणीची दूध आहे, जो कोणी ते तो पिईल गर्जना करेल'
अवध ओझा म्हणाले की, "शिक्षण हे वाघिणीची दूध आहे, जो कोणी ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही". मी अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदियाचे आभार मानतो. त्यांनी मला राजकारणात येण्यासाठी आणि शिक्षणासाठी काम करण्यास प्रोत्साहन दिले. शिक्षण हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राचा आत्मा आहे. जगात जे जे देश महान झाले त्यांच्या पार्श्वभूमीत शिक्षणाचे योगदान होते. आज माझ्या राजकीय वाटचालीच्या सुरुवातीला मला एक गोष्ट सांगावीशी वाटते की, राजकारणात येऊन शिक्षणाचा विकास करणे हे माझे ध्येय आहे.
अवध ओझा पुढे बोलताना म्हणाले की, "दिल्लीच्या सरकारी शाळेचा 12वीचा निकाल 97% लागला आहे. 2015 मध्ये सरकारी शाळेतील केवळ 15 मुले IIT-JEE MAINS मध्ये पात्र ठरली होती, यावेळी ती 783 होती. माझा नेहमीच नारा राहिला आहे की शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे. जो तो पिईल गर्जना करेल."
#WATCH AAP में शामिल होने के बाद अवध ओझा ने कहा, "दिल्ली के सरकारी स्कूल में 12वीं का रिजल्ट 97% है। 2015 में सरकारी स्कूल के केवल 15 बच्चों ने IIT-JEE MAINS क्वालीफाई किया था, इस बार 783 रहा। मेरा हमेशा नारा है कि शिक्षा शेरनी का दूध है जो पीएगा वो दहाड़ेगा।" https://t.co/mihvimJYFR pic.twitter.com/XqsH3uoyVd
— ANI_HindiNews (@AHindinews) December 2, 2024
'अवध ओझा यांच्यामूळे देशाच्या शिक्षणाला बळ मिळेल'
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल म्हणाले की, अवध ओझा 'आप'मध्ये सामील झाल्याने देशातील शिक्षणाला बळ मिळणार आहे, अवध ओझा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अरविंद केजरीवाल म्हणाले, 'अवध ओझा 'आप'मध्ये सामील झाल्याने देशाचे शिक्षण अधिक मजबूत होईल. अवध ओझा जी यांनी लाखो तरुणांना चांगले शिक्षण देऊन रोजगार आणि जगण्यासाठी सक्षम केले आहे. त्यांनी आज आम आदमी पार्टीत प्रवेश केल्याने देशाच्या शिक्षणाला बळ मिळेल."
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या सोशल मिडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे की,"देशातील सुप्रसिद्ध शिक्षक अवध ओझा जी यांनी आज आम आदमी पक्षात प्रवेश केला. त्यांचा अनुभव आणि दृष्टीकोन आपल्या शैक्षणिक धोरणाला नवी दिशा देईल. शिक्षणाबाबतची आमची धोरणे आणि काम पाहून प्रेरित होऊन त्यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. आम्ही त्यांचे आमच्या कुटुंबात मनापासून स्वागत करतो. बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही एकत्र काम करू", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.












Click it and Unblock the Notifications