Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

UPSC CDS exam 2025 Admit Card : सीडीएस-1 परीक्षेचे हाॅलतिकीट आले; डाऊनलोड कसे करायचे? घ्या जाणून

UPSC CDS exam 2025 Admit Card Released : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) ने आज, 3 एप्रिल, एकत्रित संरक्षण सेवा परीक्षा (CDS-I) साठी प्रवेशपत्र (Admit card) जारी केले आहे. ज्या उमेदवारांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते आता अधिकृत वेबसाइट upsconline.gov.in वरुन हॉल तिकीट (UPSC CDS Hall Ticket 2025) डाउनलोड करू शकतील.

UPSC CDS exam : कधी आहे सीडीएस परिक्षा

केंद्रीय लोकसेवा आयोगाची एकत्रित संरक्षण सेवा परिक्षा UPSC CDS -1 परीक्षा 13 एप्रिल 2025 रोजी होणार आहे. या परीक्षेला बसणाऱ्या सर्व उमेदवारांना परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र घेऊन जावे लागेल. यासोबतच उमेदवारांना वैध फोटो ओळखपत्रही सोबत ठेवावे लागेल. यासंदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

UPSC CDS exam 2025 Admit Card Released

परिक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे पाळावी लागणार

केंद्रीय लोकसेवा आयोगाची एकत्रित संरक्षण सेवा परिक्षेसाठी प्रवेशपत्रासोबतच आयोगाने उमेदवारांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वेही जारी केली आहेत. उमेदवारांनी गैरसोय टाळण्यासाठी खालील नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे निर्विघ्न परीक्षा देता येणार आहे. ऐनवेळी कोणतीही गैरसोय होणार नाही.

काय आहेत मार्गदर्शक तत्व

  • परीक्षा सुरू होण्याच्या 30 मिनिटे आधी उमेदवारांचा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश बंद केला जाईल.
  • प्रवेश बंद झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.
  • उमेदवारांना परीक्षा हॉलमध्ये मोबाईल फोन (अगदी स्विच ऑफ मोडमध्येही नाही) किंवा इतर इलेक्ट्रॉनिक/इतर संपर्क साधने सोबत ठेवण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • वस्तुनिष्ठ प्रकारातील उत्तरपत्रिकेत, काळ्या बॉलपॉइंट पेनशिवाय इतर कोणत्याही पेनाने लिहिलेल्या उत्तरांचे मूल्यमापन केले जाणार नाही.
  • परीक्षा हॉल/खोलीत फक्त पारदर्शक बाटलीतील पाणीच ठेवता येईल.
  • ई-ॲडमिट कार्ड अंतिम निकाल जाहीर होईपर्यंत सुरक्षित ठेवावे कारण ते सेवा निवड मंडळासमोर सादर करणे आवश्यक आहे. दिलेल्या परीक्षेच्या ठिकाणी पडताळणीसाठी ई-प्रवेशपत्र सादर न करणाऱ्या उमेदवाराला परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.

इंडियन मिलिटरी अकादमी (IMA), इंडियन नेव्हल अकादमी (INA), एअर फोर्स अकादमी (AFA) आणि ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी (OTA) मध्ये भरतीसाठी CDS परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते.

UPSC CDS Admit Card 2025 : असे करा प्रवेशपत्र डाऊनलोड

1. सर्व प्रथम अधिकृत वेबसाइटला upsc.gov.in. वर जा.
2. 'UPSC CDS 1 2025 Admit Card' या लिंकवर क्लिक करा.
3. होमपेजवर, 'ॲडमिट कार्ड' विभागात जा.
4. 'यूपीएससीच्या विविध परीक्षांसाठी ई-ॲडमिट कार्ड' हा पर्याय निवडा.
5. एक नवीन पेज उघडेल; प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध लिंकवर क्लिक करा.
6. स्क्रीनवर दाखवलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा.
7. पुढे जाण्यासाठी नोंदणी क्रमांक किंवा रोल नंबर यापैकी निवडा.
आवश्यक तपशील भरा (नोंदणी/रोल क्रमांक, जन्मतारीख आणि ओटीपी).
8. तपशील सबमिट करा आणि प्रवेशपत्र डाउनलोड करा. भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घ्या.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+