ओव्हरटेक जीवावर! उत्तरप्रदेशात उन्नावमध्ये बसला भीषण अपघात, 18 जण ठार
नवी दिल्ली - उत्तरप्रदेशातील उन्नावमध्ये ओव्हरेटक करताना टँकर डबलडेकर बस यांच्यात धडक बसली. या अपघातात बसमधील 18 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर 30 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 14 पुरुष, 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्यावर मृतदेहांचा खच पडला असून मदतकार्य वेगाने सुरु आहे.
बिहारहून दिल्लीला जात होती बस
आज पहाटे लखनऊ-आग्रा द्रुतगती मार्गावरील बांगरमाऊ कोतवालीजवळ हा अपघात झाला.अपघात झालेली बस बिहारच्या सिवान येथून दिल्लीला जात होती. त्यावेळी ओव्हरटेक करताना हा अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी प्रवाशी गाढ झोपेत होते.

...अन् प्रवासी बाहेर येऊन पडले
बस टँकरला धडकल्यानंतर हा अपघात एवढा भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली. आत बसलेले प्रवासी बाहेर येऊन कोसळले. यात अठरा जणांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर संबिंधत विभागाचे पोलिस घटनास्थळी पोहचले आहेत, तसेच डीएम आणि पोलिस अधिक्षकही घटनास्थळी पोहोचले आहेत.
#WATCH | Uttar Pradesh: Visuals from the Lucknow-Agra Expressway in Unnao where a bus collided with a milk container in which 18 people lost their lives and 19 others were injured. pic.twitter.com/abuFTDGh1M
— ANI (@ANI) July 10, 2024
असा घडला अपघात
आज पहाटे सव्वा पात वाजता हा अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले. एक्स्प्रेस वेवर बसचा वेग जास्त होता, त्याचवेळी मागून येणाऱ्या दुधाच्या टँकरने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बसची समोरासमोर धडक झाली. एका बाजूने टँकर बसच्या पुढे गेला अन् पुढे उलटला. यात हा अपघात झाला.पोलिसांनी जखमींना बांगरमाऊ सीएचसीमध्ये दाखल केले आहे. गंभीर जखमींना लखनऊ ट्रॉमा सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे.
रुस्त्यावर विखुरलेले मृतदेह
धडकेनंतर बसमधील लोक प्रचंड घाबरले आणि थेट रस्त्यावर कोसळले. प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, 10 लोक रस्त्याच्या मधोमध मृतावस्थेत पडले होते. यावेळी रस्त्यावर मृतदेहाचे खच पडले होते. तर काही जण जखमी रस्त्यावरच विव्हळत होते. बसमधील प्रवासी अपघात झाला त्यावेळी झोपले होते.
तेव्हा मोठा आवाज झाला या अपघातात काहीजण सुखरुप वाचले असून गंभीर तसेच किरकोळ जखमींना नजीकच्या रुग्णालायात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
मृतांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत
उन्नाव दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये, जखमींना 50,000 रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी जाहीर केली आहे. यासंदर्भातील वृत्त एनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
-
पुण्यात गॅसवरची दाहिनी बंद! घरगुती सिलेंडरसाठी 'एवढे' दिवस वाट पाहावी लागणार, हॉटेलंवर टंचाईचे सावट -
मंगळवार,10 मार्च 2026 चे राशीभविष्य: 'या' राशींना होणार धनलाभ, कोणासाठी शुभ तर कोणासाठी अशुभ? वाचा -
संभाजीनगरचा प्रसिद्ध रील स्टार अरुण तुपेचं संशयास्पद निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं -
वर्ल्ड कप जिंकून हा क्रिकेटर ट्रेनने घरी परतला! "टीसीने पकडले असते पण बायकोने..." पहा काय घडलं? -
Daily Horoscope 11 मार्च 2026 : आजचे राशीभविष्य, 'या' राशींना मिळणार नवीन संधी आणि जीवनात यश! -
लोकसभा अध्यक्षांच्या विरुद्धचा अविश्वास प्रस्ताव फेटाळला; विरोधकांचा पराभव की लोकशाहीची परीक्षा? -
इराण-अमेरिका युद्ध पेटलं! अमेरिकेने उद्ध्वस्त केल्या इराणच्या 'एवढ्या' युद्धनौका; तेलपुरवठा धोक्यात -
नंदकिशोर कागलीवाल यांचा गौरव; राजस्थान राज्य कृषी विद्यापीठाकडून मानद 'डॉक्टरेट' प्रदान -
8 व्या वेतन आयोगाचा काउंटडाउन सुरू! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; पगारवाढीसाठी सरकारचा 'हा' प्लॅन -
सोने-चांदीचे दर घसरले! सोने 8,797 रुपयांनी; चांदी चक्क 29,700 रुपयांनी स्वस्त; का घसरत आहेत दर? वाचा -
IPL 2026 Schedule : आयपीएलचा थरार 'या' तारखेपासून! RCB विजयाचा गड राखणार का? वाचा संपूर्ण वेळापत्रक -
LPG gas connection ekyc : एलपीजी ग्राहकांनो! ई-केवायसी करा, अन्यथा गॅस मिळणे बंद; जाणून घ्या प्रोसेस










Click it and Unblock the Notifications