Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'नो टेन्शन' 'आधार'ची माहिती लिक होणारच नाही! Aadhaar डेटा वॉल्ट' लाँच; तुमचा डेटा राहील सुरक्षित

UIDAI Launches Data Vault : डिजिटल युगात आधार कार्ड हे आपल्या ओळखीचे सर्वात महत्त्वाचे दस्तऐवज बनले आहे. मात्र, सायबर फसवणूक आणि डेटा चोरीच्या वाढत्या घटनांमुळे आधार डेटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. याच पार्श्वभूमीवर, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण UIDAI ने 'आधार डेटा वॉल्ट' (Aadhaar Data Vault) नावाचे एक अत्यंत महत्त्वाचे आणि नवीन फीचर लॉन्च केले आहे, ज्यामुळे आता तुमचा आधार डेटा अत्यंत सुरक्षित राहणार आहे.

UIDAI Launches Aadhaar Data Vault

'आधार डेटा वॉल्ट' म्हणजे काय?

  • 'आधार डेटा वॉल्ट' हे एक अति-सुरक्षित डिजिटल स्टोरेज सिस्टीम आहे.
  • या सिस्टीममध्ये तुमचा आधार क्रमांक आणि संबंधित वैयक्तिक माहिती (नाव, पत्ता, जन्मतारीख, फोटो इत्यादी) एन्क्रिप्टेड स्वरूपात साठवली जाईल.
  • एन्क्रिप्शन म्हणजे तुमचा डेटा एका सुरक्षित कोडमध्ये बदलला जातो, ज्यामुळे अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थांना तो वाचणे किंवा वापरणे अशक्य होते.
  • हे वॉल्ट हॉर्डवेअर सुरक्षा माॅड्युल्स तंत्रज्ञानावर आधारित आहे, जे डेटाला उच्च पातळीची सुरक्षा देते आणि डेटा लीक किंवा हॅकिंगचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.

'या' संस्थांना पाळावा लागणार नियम

UIDAI च्या नवीन नियमांनुसार, ज्या 'रिक्वेस्टिंग एंटिटीज' आधार डेटाचा वापर करतात, जसे की बँका, विमा कंपन्या, मोबाईल सेवा प्रदाता आणि सरकारी विभाग, त्यांना आता हे 'आधार डेटा वॉल्ट' सिस्टम वापरणे अनिवार्य आहे. यामुळे, वापरकर्त्याच्या ओळखीसाठी आधार माहिती वापरताना, डेटा कोणत्याही परिस्थितीत लीक होणार नाही, याची खात्री केली जाते.

घरबसल्या अपडेट करणे झाले सोपे

UIDAI ने नागरिकांच्या सोयीसाठी आधार अपडेट प्रक्रियाही सोपी केली आहे. आता नागरिक घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने पत्ता किंवा मोबाईल नंबर यांसारखी माहिती अपडेट करू शकतील. यासाठी सिस्टीमला जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, मनरेगा आणि वीज बिलासारख्या डेटाबेस सेवांशी जोडले जात आहे. यामुळे माहितीचे स्वयंचलित-पडताळणी करणे सोपे होईल आणि बनावट कागदपत्रांचा वापर थांबेल.

'आधार डेटा वॉल्ट' हे फिचर देशातील डिजिटल ओळखीच्या सुरक्षेसाठी एक मोठे आणि निर्णायक पाऊल आहे. यामुळे नागरिकांचा आधार डेटा पूर्णपणे सुरक्षित राहील आणि फसवणुकीच्या घटनांवर नियंत्रण मिळण्यास मदत होईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+