Tukdoji Maharaj jayanti:देशाला देव मानणारे संत तुकडोजी महाराज जयंतीनिमित्त पाठवा खास शुभेच्छा संदेश
Tukdoji Maharaj Jayanti 2025, Photo-images in Marathi: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म 30 एप्रिल 1909 मध्ये महाराष्ट्राच्या विदर्भ प्रांतातील अमरावती जिल्ह्यात यावली या गावात झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) असे होते.
खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या समाज प्रबोधनाचे खास वैशिष्ट्य मानले जाते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशालाच देव मानणारे, माणसात देव शोधणारे, गरजूंना मदत करणारे संत अशी त्यांची ख्याती आहे. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात फक्त आणि फक्त देशाच्या विकासाचाच विचार केला.

खंजिरीतून समाजप्रबोधन!
तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या व खंजिरी भजनांच्या माध्यमातून समाजसेवा व राष्ट्रनिर्माण हे ध्येय ठेवून कार्य केले. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रुढी, जाती-धर्म-पंथ भेद, अंधश्रद्धा, इत्यादी समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी समाजासमोर मांडले. त्यांच्या जयंतीनिमित्त, त्यांचे विचार व सुविचार लोकांपर्यंत पाठवून त्यांना विनम्र अभिवादन करूया..!

संत देहाने भिन्न असती।
परि ध्येय धोरणाने अभिन्न स्थिती।
साधने जरी नाना दिसती।
तरी सिद्धांतमति सारखी।।
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

धैर्यहीन मनुष्याकरिता त्याची झोपडीही
हिमालयाएवढी मोठी व जड होऊन बसते
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

तो मनुष्य मनुष्यत्वविहीन होय, जो आपण स्वत: भोजन करुन
शेजारच्या मनुष्याला उपवासी पाहूनही काही देत नाही.
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

सत्यज्ञान हेच मनुष्याचे स्वरुप आहे,
त्याला शोधीतच मनुष्य जगात थोर होत असतो.
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

नीच विचाराने जगण्यापेक्षा..!
सुशीलतेने मरणेही अधिक मौल्यवान् असते.
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

सत्याच्या बाणेदारपणाला, भरजरी पोषाख अन् सोन्याची आभूषणेही दाबू शकत नाहीत.
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज.

आपल्या शत्रुविषयीही उत्तम बुद्धी ठेवा
त्याने ईश्वराजवळ तुमची कदर होईल
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..
हिसेंपेक्षा अहिंसेची किंमत अधिक मानली जात असते
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

शस्त्रे घर्षणाने चमकतात पण शूर संघर्ष प्रसंगानीच चमकत असतो
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.

धर्म-पंथ-देशाचे भांडण |
न मिटे ऐक्य - प्रेमाविण |
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जगी नांदावी सुखी, शांती |
सर्वांनी आचरावी बंधूप्रीति |
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

मित्रांनो ! जी गोष्ट तुम्ही तुमच्याकरिता उत्तम समजता,
तीच गोष्ट दुसरऱ्याकरिताही तेवढीच उत्तम समजून मदत करा.
संत तुकडोजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

जवळच्या माणसाला फाटके पांघरूण असता,
आपल्याजवळ अधिक कपड़े संग्रही ठेवणे,
हे परमेश्वरालाही खपत नसते..!
-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
तेच लोक सज्जन असतात,
ज्यांना उत्तम कामाविषयी खुशी
आणि वाईट कामाचे दुःख होते.
--राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!

जी गोष्ट ज्याच्यात उपजत अंशत:ही नाही,
तिची हौस करुन त्याने आपली फजीती करुन घेऊ नये.
--राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
पहिल्या राष्ट्रपतींनी दिली राष्ट्रसंत ही उपाधी
तुकडोजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील संत आणि राष्ट्रीयत्वाचा संगम पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत असे संबोधित केले. स्वातंत्र्य, भारताची एकात्मता व भारताचे सुराज्य या सर्वांसाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, सोसलेला कारावास आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवून राष्ट्रवादाचे त्यांनी समर्थन केले. या महान कार्यामुळेच राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तुकडोजी महाराजांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!












Click it and Unblock the Notifications