पूजा खेडकरला मोठा धक्का! आयएएस नोकरी गमावल्यानंतर कोर्टानं जामीन फेटाळला
मुंबई - युपीएससी प्रवेशात गैरप्रकारात ठपका ठेवण्यात आलेली पूजा खेडकर हिला मोठा धक्का बसला आहे. युपीएससीने केलेल्या कारवाईनंतर आता न्यायालयाकडूनही त्यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे.
फसवणूक प्रकरणी एफआयआर
आयएएसची नोकरी गमावल्यानंतर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं महाराष्ट्र कॅडर ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा आज अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे.

पूजा खेडकर यांच्यावर केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी क्राइम ब्रँचने पूजा खेडकर विरोधात एफआयआर नोंदवल्यानंतर कोर्टाचा हा निर्णय आला आहे.
न्यायालयाकडून नाराजी
पूजा खेडकर या सत्रादरम्यान गैरहजर राहिल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त करत, त्यांची एकदा हजेरी म्हणजे त्या सर्व सत्रांना हजर होत्या असे होत नाही, असे म्हटले. पूजा खेडकर यांच्या अर्जावरील युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. पूजा खेडकर यांच्या वकिलाने युक्तिवाद केला की त्यांना अटकेची भीती वाटते आणि त्यांनी निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी अटकपूर्व जामीन मागितला आहे.
फिर्यादी पक्षाकडून फसवणुकीचा दावा
पूजा खेडकर यांनी यंत्रणेची फसवणूक केल्याचा दावा फिर्यादी पक्षाने केला आहे. खेडकर यांच्या वकिलाने कोर्टात हा युक्तिवाद केला. खेडकर यांच्या बाजूने वकील बीना महादेवन म्हणाल्या, "खेडकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरोधात लैंगिक छळाची तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे त्यांच्याविरोधात जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून हे सर्व होत आहे. पण त्या एक चांगल्या IAS असून त्या त्यांचे निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी अग्रीम जामिनाची त्या विनंती करत आहेत."
काय आहे प्रकरण?
यूपीएससीच्या तक्रारीनंतर गुन्हे शाखेने खेडकर यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. 2022 च्या नागरी सेवा परीक्षेच्या अर्जात खोटी माहिती दिल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. UPSC ने 2023 बॅचच्या प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर विरुद्ध नागरी सेवा परीक्षेत तिची ओळख बदलून विहित मर्यादेपेक्षा जास्त वेळा उपस्थित राहिल्याबद्दल एफआयआर दाखल केला होता.
UPSC ने पूजा यांना नोटीस बजावली होती आणि त्यांची निवड रद्द करण्याबाबत उत्तर मागितले होते. यूपीएससीने म्हटले होते की, पूजाविरुद्धच्या तपासात तिने तिचे नाव, पालकांचे नाव, स्वाक्षरी, फोटो, ईमेल आयडी, मोबाइल नंबर आणि पत्ता बदलून यूपीएससीची परीक्षा दिल्याचे आढळून आले. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने पूजाविरुद्ध बनावटगिरी, फसवणूक, आयटी कायदा आणि अपंगत्व कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
यूपीएससीच्या नोटिसीला उत्तर दिले नाही
18 जुलै 2024 रोजी यूपीएससीने पूजा खेडकरला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बनावट ओळखपत्र देऊन परीक्षेच्या नियमांमध्ये निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त वेळा उपस्थित राहण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्याच्यावर होता. पूजाला या नोटीसला 25 जुलैपर्यंतच उत्तर द्यायचे होते. मात्र पूजाने 4 ऑगस्टपर्यंत वेळ मागितला. मात्र यूपीएससीने त्याला ३० जुलैपर्यंतच वेळ दिला. मात्र, ती आजपर्यंत उत्तर देऊ शकली नाही. यानंतर यूपीएससीने काल कारवाई केली.












Click it and Unblock the Notifications