New Toll Tax Rules : आता 20 किमीपर्यंत टोल टॅक्स नाही,फास्टॅगचीही गरज नाही, जाणून घ्या नवीन नियम
New Toll Tax Rules : केंद्रातील मोदी सरकारने टोल टॅक्सबाबत राष्ट्रीय महामार्गावर वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा दिला आहे. आता त्यांना 20 किलोमीटरच्या परिघात ये-जा करण्यासाठी कोणताही टोल टॅक्स भरावा लागणार नाही. यासाठी तुमच्या फॉस्टटॅगची ही गरज भासणार नाही. मात्र प्रवासाचे अंतर त्यापेक्षा जास्त असेल तरचं चालकाकडून शुल्क आकारले जाईल. आता राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांना कितीही वेळ आली तरी टोल टॅक्स भरावा लागणार आहे.
सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर रस्ते आणि महामार्ग मंत्रालयाकडून अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. सरकारने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये अलीकडेच काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. टोल वसुली प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि प्रभावी बनवणे हा या सुधारणांचा उद्देश आहे.

सरकारने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये असे म्हटले आहे की "राष्ट्रीय महामार्ग, कायमस्वरूपी पूल, बायपास किंवा बोगदा वापरणाऱ्या राष्ट्रीय परमिट वाहनाव्यतिरिक्त कोणत्याही यांत्रिक वाहनाचा ड्रायव्हर, मालक किंवा प्रभारी व्यक्तीला ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टिम (GNSS) असलेल्या खासगी वाहनांना २० किमीपर्यंतच्या टोलमधून सूट दिली जाईल. नॅव्हिगेशन सॅटेलाइट प्रणालीवर आधारित शुल्क संकलन प्रणाली अंतर्गत एका दिवसात प्रत्येक दिशेने 20 किलोमीटरपर्यंतच्या प्रवासासाठी शून्य-वापरकर्ता शुल्क आकारले जाईल.
The Government has come with an Amendment in NH Fee Rule, 2008 vide GSR No. 556 dated 9th of September 2024, as an Enabling Amendments in National Highway Fee Rules to make Global Navigation Satellite System (GNSS) based tolling effective in India.
— MORTHINDIA (@MORTHIndia) September 10, 2024
1. GNSS based tolling is… pic.twitter.com/Du40IDcTc4
वाहने GNSS ने सुसज्ज असतील
राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर निर्धारण आणि संकलन) नियम, 2008 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यानंतर, ते आता राष्ट्रीय महामार्ग शुल्क (दर आणि संकलनाचे निर्धारण) दुरुस्ती नियम 2024 बनले आहे. यानुसार वाहनांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम (जीएनएसएस) बसवण्यात यावी. वाहनांचे अंतर ओळखून, महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवर दररोज 20 किमीपर्यंतचा प्रवास टोल करमुक्त असेल. GNSS म्हणजेच ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमला उपग्रह प्रणालीचा एक प्रकार म्हणतात. याद्वारे वाहनांचे ठिकाण निश्चित केले जाते.
काय आहे ऑन-बोर्ड युनिट ?
ही नवीन प्रणाली फास्टॅगप्रमाणे काम करेल. यामध्ये, तुमच्या वाहनावर एक ऑन-बोर्ड युनिट लावले जाईल, जे ट्रॅकिंग डिव्हाइस म्हणून काम करेल. याच्या मदतीने वाहनाचे लोकेशन सॅटेलाइटला पाठवले जाईल. याद्वारे उपग्रहाला वाहनाचे अंतर कळणार आहे. याशिवाय महामार्गावर बसवलेले कॅमेरे तेथे वाहनाच्या उपस्थितीची खात्री करण्याचे काम करतील. ऑन बोर्ड युनिट ओबीयू FASTag सारख्या सरकारी पोर्टलवरून देखील घेतले जाऊ शकते, जे वाहनाच्या बाहेर स्थापित करावे लागेल. हे देखील FASTag प्रमाणे काम करेल.












Click it and Unblock the Notifications