चाललंय तरी काय..? 24 तासांत 10 विमानांना उडविण्याच्या धमक्या; एका फेक काँलला होतात ३ कोटी स्वाहा
गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्बच्या धमक्या सातत्याने मिळत असल्याने खळबळ उडाली आहे. धमक्यांचा काँल आल्यानंतर विमानांचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागत आहे किंवा इतर मार्गावर वळवावे लागत आहे. गेल्या २४ तासांत १० हून अधिक भारतीय विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या. वारंवार येणाऱ्या धमक्यांमुळे विमान वाहतूक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इंडिगो आणि आकासाच्या प्रत्येकी पाच फ्लाइटला एकाच दिवसात धमक्या मिळाल्या. धमकीनंतर एका विमानाचे उड्डाण रद्द झाले तर तब्बल ३० कोटींचा अतिरिक्त खर्च कंपनीला पडतो.
विस्ताराच्या तीन विमानांना मिळाल्या धमक्या
गेल्या २४ तासांत, भारतीय विमान कंपनी असलेल्या विस्ताराच्या तीन तर एअर इंडिया एक्सप्रेसच्या एका विमानाला लक्ष्य करण्यात आले. आज शनिवारी सकाळी विस्तारा एअरलाइन्सच्या तीन आंतरराष्ट्रीय विमानांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या. त्यानंतर तत्काळ या विमानांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर धमकीचा संदेश फेक असल्याचे आढळून आले. सुरक्षा तपासणीसाठी दिल्लीहून लंडनला जाणारे विस्तारा विमान फ्रँकफर्टला वळवण्यात आले. तपासणीनंतर या विमानाने पुन्हा लंडनच्या दिशेने उड्डाण केले. विस्ताराच्या इतर दोन फ्लाइटलाही अशाच प्रकारच्या धमक्या मिळाल्या होत्या.

इंडिगोच्या विमानांनाही मिळाल्या धमक्या
इंडिगोच्या मुंबई ते इस्तंबूल 6E 17, दिल्ली ते इस्तंबूल 6E 11 आणि जोधपूर ते दिल्ली 6E 184 या विमानांनाही अशाच प्रकारच्या फेक धमक्यांचा सामना करावा लागला. अकासा एअरने शुक्रवारी त्यांच्या QP 1366 फ्लाइटच्या बेंगळुरूहून मुंबईला निघण्यापूर्वी सुरक्षा सतर्कतेचा अहवाल दिला. गेल्या आठवड्यात, एअरलाइन्सला सुमारे 70 विमानांना फेक कॉलद्वारे धमकविण्यात आले होते. या प्रकरणी तपास यंत्रणांनी १७ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले होते.
खोट्या धमक्यांनी होतात तीन कोटी स्वाहा
विमानांना उडविण्याची धमकी आल्यानंतर विमान इमर्जन्सी लँन्डींग करावेलागते. किंवा ते इतरत्र वळवावे लागते. एका विमानात वैमानिक, स्टाफ असे मिळून २०० प्रवाशी असतात. विमान लॅन्डींग केल्यावर त्यांच्या राहण्याची व्यवस्था हाँटेलमध्ये करावी लागते. याशिवाय त्यांना झालेल्या त्रासाच्या बदल्यात आर्थिक दंडही द्यावा लागतो. शिवाय अतिरिक्त विमानाची सोय करावी लागते. त्यात इंधनाचाही अपव्यय होतो. या सगळ्यांचा खर्च विचारात घेतला तर एका फेक काँलनंतर विमान कंपन्यांना सुमारे तीन कोटींचे नुकसान सहन करावे लागते.












Click it and Unblock the Notifications