Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कुंभमेळ्यातील आगीची चौकशी होणार; एडीएम आणि सेक्टर मॅजिस्ट्रेटचे पथक तयार

प्रयागराजमधील महाकुंभ मेळा परिसरात रविवारी दुपारी साडेचार वाजता आग लागली. शास्त्री पुलाजवळील सेक्टर 19 मधील गीता प्रेस कॅम्पमध्ये ही आग लागली. आगीत गीता प्रेसच्या 180 कॉटेज जळून खाक झाल्या. आता या आगीची दंडाधिकारी चौकशी करणार आहेत. महाकुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद यांच्यावतीने एडीएम प्रशासन व सेक्टर मॅजिस्ट्रेटची टीम तयार करण्यात आली आहे.

Kumbh Mela 2025

आगीत प्रचंड नुकसान

स्वयंपाक करताना सिलिंडरचा स्फोट झाला. यानंतर अनेक सिलिंडरचा स्फोट झाला. आग विझविण्यासाठी 12 अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या. अग्निशमन दलाने सुमारे तासाभरात आग आटोक्यात आणली. आगीत 50 तंबू जळाले. तर, एका संन्याशाच्या एक लाख रुपयांच्या नोटाही जळाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री योगींना फोन करून घटनेची संपूर्ण माहिती घेतली. आगीच्या घटनेच्या काही काळापूर्वी मुख्यमंत्री योगींनी हेलिकॉप्टरमधून महाकुंभमेळा परिसराची पाहणी केली होती.

चौकशी टीम तयार

मौनी आमावस्या सणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदीत्यनाथ मेळाव्यात होते. त्यांनीही अपघातस्थळी पोहचून अधिकाऱ्यांना सूचना केल्या. आग विझविण्याच्या प्रयत्नात दोन जण भाजल्याचे बोलले जात आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. दरम्यान आता या आगीची दंडाधिकारी चौकशी करणार आहेत. महाकुंभमेळा अधिकारी विजय किरण आनंद यांच्यावतीने एडीएम प्रशासन व सेक्टर मॅजिस्ट्रेटची टीम तयार करण्यात आली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+