दिल्लीतील सर्वात श्रीमंत आमदार आहेत फक्त १० वी पास; अमेरिकेत आहेत चार बंगले, कोण आहेत ते?
शनिवारी दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात आम आदमी पक्षाची सत्ता गेली. भाजपने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता काबीज केली. या निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदीया, अवध ओझा यांच्यासारख्या दिग्गजांचा पराभव झाला. त्यांना पाडणाऱ्या अनेक नेत्यांची चर्चा झाली. मात्र दिल्लीत सर्वात श्रीमंत आमदाराचीही सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे हे नूतन आमदार फक्त दहावी पास आहेत. ते कोण आहेत, तेच आपण पाहूयात...

सर्वात श्रीमंत आमदार कोण?
दिल्लीतील अनेक उमेदवारांची आज दिवसभर चर्चा सुरु होती. त्यात चर्चेत आले, भाजपचे कर्नल सिंग. कर्नल सिंग हे दिल्लीतले सर्वात श्रीमंत आमदार समजले जातात. त्यांच्याकडे करोडोंची संपत्ती आहे. नामांकन अर्ज भरताना त्यांची संपत्ती समोर आली. त्यांची अमेरिकेतही चार घरे आहेत. लोखोंचे दागिने त्यांच्याकडे आहेत. एका वृत्तानुसार कर्नेल सिंग हे फक्त दहावी पास आहेत.
कोठून मिळवला विजय?
भाजपचे कर्नल सिंग यांनी शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. आपचे सत्येंद्र जैन यांच्याविरोधात त्यांनी १८ हजार ८६३ मतांनी विजय मिळवला. शकूर बस्ती विधानसभा मतदारसंघ हा कर्नेल सिंग यांच्यामुळे चांगलाच चर्चेत आला होता. आप व भाजपमध्ये येथून कोण विजयी होईल, याबाबत चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. अखेर अटीतटीच्या लढतीत भाजपच्या कर्नेल सिंग यांनी विजय मिळवला.
किती आहे संपत्ती?
कर्नल सिंग यांच्याकडे २५९.६७ कोटींची मालमत्ता आहे. त्यांच्याकडे १ लाख ३२ हजार रुपये रोख, बँक खात्यात २७.५९ लाख रुपये जमा आहेत. त्यांनी २५ लाखांचा जिवनविमाही घेतलेला आहे. त्यांच्याकडे ३८.४५ लाखांचे सोने व हिऱ्यांचे दागिनेही आहेत. त्यांच्याकडे ९२.३६ लाखांची जंगम मालमत्ताही आहे. या भाजप आमदाराची संपत्ती २५८ कोटींपेक्षा जास्त आहे.
अमेरिकेतही आहे घरे
या आमदाराकडे हरियाणात ६० कोटींचे फार्महाऊस आहे. याशिवाय सोनिपत येथे ५५ लाखांचे दुकान आहे. अमेरिकेतली वॉशिंग्टन व कॅलिफोर्नियापासून सोनीपतपर्यंत त्यांचे १९८ कोटींचे घरही आहे. त्यांची अमेरिकेत चार घरे असल्याचे त्यांनी त्यांच्या संपत्ती विवरणात स्पष्ट केले आहे. या सर्वात श्रीमंत आमदाराची सध्या दिल्लीत चांगलीच चर्चा सुरु आहे.












Click it and Unblock the Notifications