Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; १३ कोटी शेतकऱ्यांना 'या' दिवशी मिळणार दोन हजार रुपये

शेतकरी सध्या शेतकरी सन्मान निधीच्या 19 वा हप्त्याची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठीची ही योजना सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आता याच योजनेचा एकोनिसावा हप्ता फेब्रुवारी महिन्यात मिळण्याची शक्यता वाढली आहे. 2019 मध्ये सुरू करण्यात आलेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. ती तीन समान हप्त्यांमध्ये वितरित केली जाते.

Shetkari Samman Yojana

आतापर्यंत सरकारने 18 हप्ते यशस्वीरित्या वितरित केले आहेत. त्याचा फायदा देशातील 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना झाला. 18 वा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये देण्यात आला होता. आता पुढचा हप्ता फेब्रुवारी 2025 मध्ये चार महिन्यांच्या अंतराने येईल, अशी अपेक्षा आहे. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. पण यावेळी 13 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

ई-केवायसीबाबत आदेश

या योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा, यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप त्यांचे ई-केवायसी अपडेट केलेले नाही. त्यांचा हप्ता उशीरा मिळण्याचा धोका आहे. योजनेची पारदर्शकता राखणे आणि गरजू शेतकऱ्यांना थेट लाभ पोहोचवणे हा ई-केवायसी प्रक्रियेचा उद्देश आहे.

योजनेचे उद्दिष्ट आणि परिणाम:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा उद्देश देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करणे हा आहे. 6,000 रुपयांची वार्षिक मदत तीन हप्त्यांमध्ये वितरीत केली जाते. यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक दबाव कमी होण्यास मदत होते. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी ही योजना अतिशय महत्त्वाची समजली जाते. सरकारने पीएम किसान योजनेसह इतर अनेक योजनांद्वारे शेतकऱ्यांची आव्हाने कमी करण्याचा प्रयत्न केला आहे.

फेब्रुवारीत येणार पुढचा हप्ता

शेतकऱ्यांसाठी हे नवीन वर्ष नवी आशा आणि समृद्धी घेऊन येणार आहे. पीएम किसान योजनेचा 19 वा हप्ता केवळ आर्थिक मदतीचे प्रतीक नाही तर सरकारच्या शेतकऱ्यांप्रती कायम असलेल्या बांधिलकीचाही पुरावा आहे. फेब्रुवारीत हा हप्ता मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+