Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मिर्झापूर-प्रयागराज हायवेवर भीषण अपघात; बोलेरो-बसची धडक, 10 जण जागीच ठार

Mirzapur-Prayagraj highway Accident, 10 killed : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर-प्रयागराज महामार्गावर मोठा अपघात झाला आहे. जिथे एक बोलेरो आणि बसची टक्कर झाली. ज्यामध्ये 10 जणांचा ऑन दी स्पॉट मृत्यू झाला. तर 19 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यातील भाविक संगममध्ये स्नान करून बोलेरोने परतत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दरम्यान हा अपघात झाला. बसमध्ये प्रवास करणारे लोक मध्य प्रदेशातील राजगडचे रहिवासी होते.

Mirzapur-Prayagraj highway Accident

बोलेरोमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, बोलेरोमध्ये प्रवास करणारे सर्व जण मृत्युमुखी पडले, तर बसमधील प्रवासी जखमी झाले. बसमधील प्रवासी मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. संगममध्ये स्नान केल्यानंतर वाराणसीला जात होतो. ही टक्कर इतकी भीषण होती की बोलेरोचे मोठे नुकसान झाले.

भाविकांना रस्त्यावर फेकण्यात आले. कोणाचा हात तुटला होता तर कोणाचे डोके फुटले होते. बोलेरोमध्ये बरेच लोक अडकले. बोलेरोमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले.

Mirzapur-Prayagraj highway Accident

या भागातील आयुक्त तरुण गाबा आणि डीएम रवींद्र कुमार मांधड घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

एसपी यमुनापार विवेक यादव म्हणाले की, बोलेरोमधील सर्व प्रवासी पुरुष होते. बोलेरोचा वेग खूप जास्त होता. बस चालकाने ब्रेक लावले, पण बोलेरो समोरून बसला धडकली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+