तेलंगणा बोगदा दुर्घटना : कामगारांपासून 40 मीटर दूर बचाव पथक, कामगार वाचण्याची पुन्हा बचाव कार्य सुरु
Telangana tunnel accident Update : तेलंगणातील नागरकुरनूल बोगदा दुर्घटनेत अडकलेल्या कामगारांपासून बचाव करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मिळालेल्या माहीतीनुसार कामगारांचा बचाव करण्यासाठी पथक फक्त 40 मीटर अंतरावर आहे. पण बचाव पथक पुढे जाऊ शकत नाही. बोगद्याच्या आत पाण्याची पातळी वाढत असल्याने आणि चिखलाचा प्रवाह वाढत असल्याने बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत. कामगारांचा शोध घेण्यासाठी स्निफर डॉग देखील दाखल करण्यात आले आहेत. तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे पथक पुढे जाऊ शकले नाहीत. बचाव पथकाला अद्याप कामगारांशी संपर्क साधता आलेला नाही.

तेलंगणाच्या नगरकुरनूल जिल्ह्यात श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (एसएलबीसी) बोगद्याचा एक भाग कोसळल्यानंतर आठ कामगार ढिगाऱ्यात अडकले आहेत. कामगारांच्या जगण्याची शक्यता सतत कमी होत आहे. कामगारांना वाचवण्याचे इतर मार्ग शोधण्यासाठी तेलंगणा सरकारने भारतीय भूगर्भीय सर्वेक्षण (GSI) आणि राष्ट्रीय भूभौतिक संशोधन संस्थेतील (NGRI) तज्ञांची मदत घेतली आहे.
नगरकर्नूलचे जिल्हाधिकारी बी. संतोष यांनी मंगळवारी सांगितले की, पुढील कोणतेही पाऊल उचलण्यापूर्वी बोगद्याची स्थिरता विचारात घेण्यात आली आहे. तसेच पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जीएसआय आणि एनजीआरआयच्या तज्ञांव्यतिरिक्त, एल अँड टीच्या ऑस्ट्रेलियन युनिटचा देखील समावेश करण्यात आला आहे. ज्यांना बोगद्यांचा व्यापक अनुभव आहे.
जिल्हाधिकारी म्हणाले की, आतापर्यंत आम्हाला अडकलेल्या लोकांशी संपर्क साधता आला नाही. आम्ही भारतीय भूगर्भ सर्वेक्षण आणि इतर काही लोकांकडून सल्ला घेत आहोत. सध्या बोगद्यातून पाणी काढण्याचे काम सुरू आहे. आम्ही पुढे जात आहोत. पुढील पावले उचलण्यासाठी आम्ही GSI आणि NGRI कडून सल्ला घेत आहोत.
#WATCH | Nagarkurnool, Telangana | Nagarkurnool District Collector, Badavath Santhosh says, "We have sent a team of NDRF, SDRF personnel who worked inside Silkyara tunnel and Rat Miners inside the tunnel. The last 40-meter point is full of sludge. The team has taken additional… pic.twitter.com/8gs5NVZozT
— ANI (@ANI) February 25, 2025
याशिवाय एल अँड टीचे तज्ज्ञही येथे दाखल झाले आहेत. जिल्हाधिकारी म्हणाले की, चिखल आणि मातीच्या ढिगा-या साचल्यामुळे, आठ लोक अडकलेल्या शेवटच्या पन्नास मीटरपर्यंत टीम पोहोचू शकत नाही. दरम्यान, तेलंगणाचे मंत्री जुपल्ली कृष्णा राव म्हणाले की, बोगद्यात अडकलेल्या लोकांचे वाचण्याची शक्यता खूपच कमी आहे. अपघातस्थळ चिखल आणि ढिगाऱ्यांनी भरलेले असल्याने कामगारांना वाचवण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागतील, त्यामुळे बचाव कर्मचाऱ्यांना काम करणे कठीण होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाणी वाढल्याने टनेल बोअरिंग मशीन सुमारे 200 मीटर पुढे सरकले आहे. याशिवाय मातीचा ढिगारा काढणाऱ्या कन्व्हेयर बेल्टचेही नुकसान झालं आहे. यामुळे बचावकार्य काही काळ थांबवावे लागलं आहे. 2023 मध्ये, उत्तराखंडमधील सिल्कयारा बेंड-बारकोट बोगद्यात अडकलेल्या कामगारांना वाचवणाऱ्या 'रॅट मायनर्स'च्या 6 सदस्यीय पथकाने बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथकात सहभागी झाले असून बचाव कार्य पून्हा सुरु करण्यात आले आहे.












Click it and Unblock the Notifications