मोठी बातमी : तेलंगणाच्या SLBC बोगद्यात अडकलेले 8 कामगार मृतावस्थेत आढळले, शोधमोहीम थांबली
Telangana SLBC tunnel rescue Update : तेलंगणातील नागरकुरनूल येथील एसएलबीसी बोगद्यात अडकलेल्या आठ कामगारांचा अखेर मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. गेल्या सहा दिवसांपासून शोधकार्य सुरू होते. परंतु, रेस्क्यू पथकाला यश मिळत नव्हते. तर आज शोधमोहीम सुरु असताना अखेर सर्व कामगार मिळाले परंतु ते मृतावस्थेतच. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. बचाव पथकाने तीन मीटर खोलीवरून मृतदेह बाहेर काढले. अखेर बचावकार्य थांबविण्यात आले.
नेमकी काय घडली होती घटना?
तेलंगणातील नागरकुरनूल येथील निर्माणाधीन श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनाल (SLBC) बोगद्याचा एक भाग 22 फेब्रुवारी रोजी कोसळला होता. या घटनेला आज सहा दिवस पूर्ण झाले. पण बोगद्यात अडकलेल्या 8 कामगारांना अद्याप वाचवण्यात आलेले नव्हते. त्यासाठी आज शुक्रवारी देखील बचावकार्य सुरु होते, अखेर बोगद्यात अडकलेल्या आठही लोकांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे ही शोध मोहीम अखेर थांबली.

दक्षिण मध्य रेल्वेचे दोन पथक बचावकार्यात आले होते
शुक्रवारी, दक्षिण मध्य रेल्वे (SCR) च्या दोन पथके देखील बचावकार्यासाठी पोहोचली. प्लाझ्मा कटर आणि ब्रॉक कटिंग मशीन सारख्या आधुनिक उपकरणांनी कापून पथक जड धातू मार्गातून काढून टाकला गेला. राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्थेचे (एनजीआरआय) शास्त्रज्ञही घटनास्थळी पोहोचले होते. ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार (GPR) च्या मदतीने ढिगाऱ्याखाली गाडलेल्या कामगारांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#WATCH | Nagarkurnool, Telangana | Singareni Collieries rescue teams exit the collapsed SLBC tunnel after deploying rescue operation efforts inside the tunnel since yesterday evening. Eight workers are trapped inside the tunnel after its portion collapsed on 22nd February. pic.twitter.com/BrEgE3uY2i
— ANI (@ANI) February 28, 2025
TOI अहवालानुसार, यापूर्वीच सांगितले गेले होते की, कामगार जिवंत सापडण्याची शक्यता खूपच कमी आहे, ते अगदी खरे ठरले. नगरकुरनूलचे एसपी वैभव गायकवाड म्हणाले की, ढिगारा हटवण्याचे आणि लोखंडी सळ्या कापण्याचे काम सतत सुरू होते. गुरुवारी सकाळपासून बोगद्यातील ढिगारा साफ करण्याचे आणि पाणी बाहेर काढण्याचे काम सुरू होते.
शुक्रवारी सकाळी 7 वाजता एक टीम बोगद्यात गेली होती. तर आज चार वाजेपर्यंत अखेर बोगद्यात अडकलेल्या लोकांचा मृतदेह अखेर बाहेर काढण्यात आला. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ व्यतिरिक्त, राज्य सरकारच्या इतर एजन्सींचे सुमारे 600 कर्मचारी बचाव कार्यात गुंतलेले होते. उत्तराखंडमधील सिल्करिया बोगद्यात अडकलेल्या लोकांना वाचवणाऱ्या पथकाचाही यामध्ये समावेश आहे.












Click it and Unblock the Notifications