Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

खा. तेजस्वी सूर्या आहे करोडोंचा मालक; लग्नानिमित्त चर्चेत आलेल्या तेजस्वीची संपत्ती नेमकी किती? वाचा

भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांचे लग्न आज सर्वात जास्त चर्चेत राहिले. तेजस्वी सूर्या यांनी कन्नड गायिका शिवश्री स्कंदप्रसादशी लग्न केले. कोट्यवधींचा मालक असलेल्या तेजस्वी सूर्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तेजस्वी सूर्याची पत्नी शिवश्री स्कंदप्रसाद ही कन्नड संगीत, भरतनाट्यम आणि चित्रकला यात पारंगत आहे. या जोडीची आज दिवसभर सर्व मीडियात चर्चा सुरु होती. तेजस्वी सूर्या किती श्रीमंत आहे, हेच आपण आज पाहू...

Tejaswi Surya s wife

तेजस्वी सूर्याची संपत्ती किती?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत बेंगळुरू दक्षिण लोकसभा मतदारसंघातून तेजस्वी सूर्या याने अर्ज भरला होता. त्यावेळी नामांकन अर्ज दाखल करताना, मालमत्तेचा तपशील दिला होता. जो खालीलप्रमाणे आहे.
- तेजस्वी सूर्या यांच्याकडे रोख रक्कम आहे - ८० हजार रुपये
- कोटक महिंद्रा बँक गिरीनगर शाखा बेंगळुरू खाते: रु. १,२३,३३५
- एसबीआय संसद भवन खाते - २ लाख ८७ हजार ८८८
- एचडीएफसी बँक बसेश्वर नगर बेंगळुरू खाते: १ लाख ९ हजार २०७ रुपये
- कॅनरा बँक गिरीनगर शाखा बेंगळुरू खाते - २५,००० रुपये

तेजस्वी सूर्याची शेअर बाजारात गुंतवणूक

- म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक - १ कोटी ९९ लाख ४४ हजार ८६३ रुपये
- विविध शेअर्समध्ये गुंतवणूक - १ कोटी ७९ लाख ३१ हजार ७५० रुपये
- एलआयसीमध्ये- १ लाख ६९ हजार ७५० रुपये
- संपूर्ण रक्षा जीवन विमा - ४ लाख ७० हजार ६६६ रुपये
- मणिपालसिग्ना लाईफ टाईम हेल्थ इन्शुरन्स - २४,१६३ रुपये
- इतर - १८,६३,८६७ रुपये
- तेजस्वी सूर्या यांची एकूण मालमत्ता- ४,१०,३०,४८९ रुपये

पत्नीचे शिक्षण नेमके किती?

तेजस्वी सूर्या यांच्या पत्नी शिवश्री यांनी सस्त्र विद्यापीठातून बायोइंजिनिअरिंगमध्ये पदवी प्राप्त केली आहे. भरतनाट्यममध्ये पदव्युत्तर पदवी आणि मद्रास विद्यापीठातून संस्कृतचा अभ्यास करण्याव्यतिरिक्त, तिने आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजीमध्ये डिप्लोमा देखील केला आहे. शिवश्री सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. त्यांच्या YouTube चॅनेलवर भक्ती संगीत आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम उपलब्ध आहेत. त्यांची गाणी स्पॉटीफाय आणि यूट्यूब सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्मवर देखील प्रदर्शित झाली आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+