खोडकर की शिस्तबद्ध वर्गात कसे होते नरेंद्र मोदी? जाणून घ्या त्यांना PM बनवणाऱ्या 4 शिक्षकांबद्दल
Teachers day 2025 pm narendra modi school teachers list : आज शिक्षक दिवस प्रत्येक पाच सप्टेंबरला हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डाॅक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस समर्पित आहे. शिक्षक दिन अनेकांच्या जीवनातील अमुल्य क्षण या दिवशी गुरुला वंदन केले जाते. आज आपण ज्यांना देशाचे पंतप्रधान बनवले असे पीएम नरेंद्र मोदी यांचे शिक्षक कोण होते हे जाणून घेऊया. यासह नरेंद्र मोदी त्यांच्या विद्यार्थी दशेत खोडकर होते की, शिस्तबद्ध हेही जाणून घेऊया.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे गुजरातच्या वडनगर येथील छोट्या शाळेत पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यावेळी त्यांच्या शिक्षिका हिराबेन मुलचंद या होत्या. त्यानंतर त्यांच्या एकूण चार शिक्षकांबद्दल माहिती उपलब्ध आहे, जाणून घेऊया.
1. हिराबेन मुलचंद मोदींच्या पहिल्या गुरु
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा विद्यार्थी दशेत होते, त्यावेळी त्यांच्या पहिल्या शिक्षिका हिराबेन मुलचंद या होत्या. त्यांचे आणि नरेंद्र मोदी यांचे घर समोरा-समोर होते. भास्करच्या रिपोर्टनुसार हिराबेन मुलचंद या गर्वाने सांगतात की, "मी ज्याला शिक्षण दिले तो नरेंद्र आज देशाचा पंतप्रधान आहे, यापेक्षा मोठा गौरव माझ्यासाठी काय आहे? " हिराबेन यांच्या माहितीनुसार, नरेंद्र बालपणी खूपच शिस्तबद्ध आणि संस्कारीत विद्यार्थी होते. ते संध्याकाळी महादेवाची आरती केल्यानंतर आई-वडीलांना नमस्कार करायचे. शाळेत त्यांची सजगता, जिज्ञासूपणा इतर मुलांपेक्षा वेगळा असायचा. हिराबेन यांच्या मते नरेंद्र मोदी असे विद्यार्थी होते जे छोट्या-छोट्या गोष्टींत मोठेपण दाखवायचे.
सध्या कुठे आहेत? - आताच्या माहितीनुसार, हिराबेन यांची सध्याची स्थिती स्पष्ट नाही, परंतु त्यांचे वय लक्षात घेता, त्या आता वृद्धापकाळात असण्याची शक्यता आहे आणि त्या त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.
2. प्रल्हादभाई पटेल, पंतप्रधान मोदींचे दुसरे शिक्षक
नरेंद्र मोदींनी वडनगरच्या बी.एन. हायस्कूलमध्ये नववीत प्रवेश घेतल्यावर प्रल्हादभाई पटेल त्यांचे शिक्षक बनले. नववी ते अकरावीपर्यंत त्यांनी मोदींना शिकवले. प्रल्हादभाई सांगतात की, "नरेंद्रला संस्कृत आणि गुजराती भाषेची विशेष आवड होती. या विषयांत प्रश्न विचारण्यात तो नेहमीच पुढे असायचा."

प्रल्हादभाई पटेल PM मोदींचे शिक्षक
मोदींची आणखी एक खासियत म्हणजे त्यांची स्पर्धात्मक वृत्ती. नाटक असो, वादविवाद असो किंवा कोणतीही स्पर्धा असो, नरेंद्र त्यात नेहमीच भाग घ्यायचे. एका नाटकात 'जोगीदास खुमान'ची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी आग्रह धरला होता. हातात तलवार घेऊन त्यांनी रंगमंचावर अशी काही जादू केली की टाळ्यांचा कडकडाट थांबलाच नाही, असे प्रल्हादभाई सांगतात.
सध्या कुठे आहेत? - प्रल्हादभाई आता सेवानिवृत्त झाले असून वडनगरमध्येच राहतात. मात्र, त्यांच्या सध्याच्या स्थितीबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.
3. जगदीश नाईक: गुरु-शिष्याचे भावुक मिलन
11 जून 2022 रोजी, नवसारी येथील एका रुग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींची त्यांच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक जगदीश नाईक यांच्याशी भेट झाली. ही भेट इतकी भावूक होती की, तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. मोदींनी दोन्ही हात जोडून आपल्या गुरूंना नमस्कार केला, तर जगदीश नाईक यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद दिला. त्यावेळी जगदीश नाईक म्हणाले होते, "माझा विद्यार्थी आज देशाचा पंतप्रधान आहे, यापेक्षा मोठे सुख माझ्यासाठी काय असू शकते? नरेंद्रच्या खांद्यावर संपूर्ण देशाची जबाबदारी आहे, तरीही त्याच्यात थोडाही अहंकार नाही."

जगदीश नाईक PM मोदींचे शिक्षक
सध्या कुठे आहेत? - जगदीश नाईक यांच्या सद्यस्थितीची कोणतीही माहिती उपलब्ध नाही. 2022 मध्ये ते जवळपास 88 वर्षांचे होते आणि आपल्या मुलीसोबत तापी जिल्ह्यात राहत होते.
4. रासबिहारी मणियार : पत्र लिहिणारे गुरुजी
वडनगरच्या बी.एन. विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक रासबिहारी मणियार यांचे नावही मोदींच्या जीवनात महत्त्वाचे आहे. 88 वर्षांचे असतानाही ते आपल्या प्रिय शिष्याला पत्र लिहून आपले विचार आणि सूचना पाठवत असत. एकदा त्यांनी मोदींना सल्ला दिला होता की, जॅकेटमध्ये एकाऐवजी दोन पेन ठेवा, जेणेकरून गरज पडल्यास दुसरा उपयोगी येईल.

रासबिहारी मणियार PM मोदींचे शिक्षक
मोदींच्या मेहनती आणि शिस्तीचा त्यांना अभिमान होता. ते सांगायचे की, "नरेंद्रचे हस्ताक्षर थोडे कच्चे होते, पण अभ्यास आणि खेळांमध्ये तो नेहमीच अव्वल होता." त्यांनी एक मजेदार किस्सा सांगितला होता की, एकदा नरेंद्र तलावातून मगरीचे पिल्लू पकडून घरी घेऊन आले होते. तेव्हा त्यांच्या आईने घाबरून त्याला परत सोडून येण्यास सांगितले होते.
મારી શાળાના શિક્ષક રાસબિહારી મણિયારના અવસાનના સમાચાર સાંભળી ખૂબ જ વ્યથિત છું.
— Narendra Modi (@narendramodi) November 27, 2022
મારા ઘડતરમાં તેમનો અમૂલ્ય ફાળો છે. હું જીવનના આ પડાવ સુધી તેમની સાથે જોડાયેલો રહ્યો અને એક વિદ્યાર્થી હોવાના નાતે મને સંતોષ છે કે જીવનભર મને તેમનું માર્ગદર્શન મળતું રહ્યું. pic.twitter.com/QmlJE9o07E
27 नोव्हेंबर 2022 रोजी रासबिहारी मणियार यांचे निधन झाले. त्यावेळी मोदींनी गुजराती भाषेत ट्वीट करून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती आणि म्हटले होते, "माझ्या आयुष्यात त्यांचे अमूल्य योगदान होते. मला त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मिळाला."
नरेंद्र मोदी खोडकर होते शिस्तबद्ध विद्यार्थी?
शाळेत नरेंद्र मोदी खेळकर स्वभावाचे होते, पण त्याचवेळी ते शिस्तबद्धही होते. मगरीचे पिल्लू घरी आणण्यासारख्या खोड्या त्यांच्या बालपणाचा भाग होत्या, पण त्याचबरोबर ते प्रत्येक काम पूर्ण एकाग्रतेने करत असत. नाटकात 'जोगीदास खुमान'ची भूमिका असो किंवा संस्कृतमधील कठीण प्रश्न असोत, नरेंद्रमध्ये नेहमीच काहीतरी वेगळे करण्याची जिद्द होती.












Click it and Unblock the Notifications