Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

बुलेट प्रूफ कार ते विशेष कमांडो! किती कडक आहे भारताचा दुश्मन तहव्वूर राणासाठी सुरक्षाव्यवस्था?

Tahawwur Rana : मुंबईतील 26/11 हल्ल्याचा मास्टरमाईंड आणि भारताचा सर्वात मोठा दुश्मन तहव्वूर राणाला भारतात आणले आहे, त्याच्या सुरक्षाव्यवस्थेत कोणतीही कसर यंत्रणांनी ठेवलेली नाही. त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे सुरक्ष व्यवस्थेत विशेष स्पेशल वेपन आणि टॅक्टिक्स कमांडोजचे कडे राहणार आहे. त्यातच बुलेट प्रुफ कारमधून त्याला आणण्यात येणार आहे.

भारताचा दुश्मन तहव्वूर राणाला अमेरिकेतून प्रत्यार्पण कराराद्वारे भारतात आणले गेले आहे. यावेळी चोख सुरक्षाव्यवस्था होती, आता तिहार तुरुंगातही त्याला चोख सुरक्षाव्यवस्थेत ठेवण्यात येणार आहे. त्याच्यासाठी किती कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे हे जाणून घेऊया.

Tahawwur Rana

एनआयए न्यायालयात हजर करणार..?

भारतात पोहोचल्यानंतर, पाकिस्तानी वंशाचा कॅनडाचा नागरिक आणि मास्टरमाइंड तहव्वूर राणा दिल्लीतील पटियाला हाऊस येथील राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) न्यायालयात हजर होण्याची शक्यता आहे. तहव्वूर राणाला घेऊन जाणारे विमान लवकरच दिल्लीच्या पालम विमानतळावर उतरेल आणि त्याला बुलेटप्रूफ वाहनातून NIA मुख्यालयात नेले जाईल. तिथे चौकशी करुन त्याला एनआयए न्यायालयात हजर केले जाईल.

Take a Poll

राणाचा प्रवास होणार बुलेटप्रुफ कारमधून

तहव्वूर राणाला दिल्लीच्या पालम विमानतळावर आणल्यानंतर त्याच्यासाठी खास कारची व्यवस्था करण्यात आली आहे. ही कार बुलेटप्रुफ असेल, राणाला बुलेटप्रूफ कारमधून एनआयए मुख्यालयात नेण्यात येईल. तिथे पालम विमानतळावर चोख सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. येथे खास कमांडोही तैनात करण्यात आले आहेत. यासह त्याला ज्या मार्गावरुन नेण्यात येणार त्या मार्गावर कडेकोट सुरक्षा राहील. तसेच काही पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.

सुरक्षेसाठी SWAT कमांडो ...

तहव्वूर राणाला एनआयए मुख्यालयात हजर करण्यासाठी SWAT म्हणजेच स्पेशल वेपन्स अँड टॅक्टिक्स कमांडो तैनात करण्यात आले आहेत. ते विमानतळावर आहेत, बुलेटप्रुफ वाहनासोबतच निशानेबाज वाहनही स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.

एनआयए काय करणार चौकशी

  • तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होऊ शकते.
  • 26/11 च्या हल्ल्यामागे पाकिस्तानच्या सरकारचा काही संबंध आहे का याची चौकशी केली जाईल.
  • मुंबई हल्ल्याचा कट कसा व कधी रचला, त्यात सरकारी घटकांची भूमिका होती का हे तपासले जाईल.
  • अजमल कसाब आणि इतर अतिरेक्यांसोबत राणाचे संबंध कसे आले हेही तपासले जाईल.
  • एनआयएने राणा यांच्यावर इमिग्रेशन कन्सल्टन्सी व्यवसायातून गुप्तहेर केल्याचा आरोप केला आहे.
  • सध्या अमेरिकेच्या तुरुंगात असलेल्या पाकिस्तानी अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडलीने ही गुप्तहेर कारवाई केली होती.
  • आता डेव्हिड कोलमन हेडली आणि राणाचे संबंध काय आहेत, याबाबत चौकशी केली जाऊ शकते.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+