Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भाजपला मोठा धक्का ! कट्टर हिंदुत्ववादी आमदाराने दिला पक्षाचा राजीनामा

तेलंगणा भाजपमध्ये प्रदेशाध्यक्षाच्या नियुक्तीपूर्वीच मोठा राजकीय भूकंप घडला आहे. गोशामहल मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे फायरब्रँड नेते टी. राजा सिंग यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. सूत्रांनुसार, प्रदेशाध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी नाकारण्यात आल्यामुळे ते नाराज होते.

T Raja Singh resigns


भाजपकडून रामचंदर राव यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर त्यांनी निराशेने राजीनामा दिला. रामचंदर राव यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरला असून त्यांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. रामचंदर राव हे ब्राह्मण समाजाचे आहेत आणि तेलंगणातील जातीय समीकरणं लक्षात घेता त्यांची निवड झाल्याचे सांगितले जात आहे.

टी. राजा सिंग यांचा राजीनामा आणि प्रतिक्रिया

राजा सिंग यांनी आपला राजीनामा तेलंगणा भाजप अध्यक्ष जी. किशन रेड्डी यांच्याकडे पाठवला आहे. पत्रात त्यांनी लिहिले की, "रामचंदर राव यांना प्रदेशाध्यक्ष करण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक आहे. माझ्यासोबत उभ्या असलेल्या लाखो कार्यकर्त्यांसाठी हा निर्णय निराशाजनक आहे. कार्यकर्त्यांना फसवले गेल्याची भावना झाली आहे."

राजा सिंग यांनी २०१८ मध्ये गोरक्षणाच्या मुद्यावरूनही राजीनामा दिला होता, पण त्या वेळी पक्षाने तो स्वीकारला नव्हता.

हिंदुत्ववादी चेहरा आणि लोकप्रियता

राजा सिंग हे तेलंगणातील भाजपचे प्रभावशाली हिंदुत्ववादी नेते मानले जातात. त्यांनी खुलेपणाने राष्ट्रवादी आणि हिंदुत्व विचारसरणीचा प्रसार केला आणि त्यामुळेच काँग्रेसच्या प्रभावाखाली असतानाही त्यांनी गोशामहल मतदारसंघातून विजयी होत आपली ताकद सिद्ध केली होती.

त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक तरुण कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. प्रचारसभा, रॅली आणि विविध जनजागृती कार्यक्रमांद्वारे त्यांनी पक्षाचा आधारवर्ग वाढवण्याचे प्रयत्न केले होते.

भाजपसाठी धोका की संधी?

राजा सिंग यांच्या राजीनाम्यामुळे दक्षिण भारतात भाजपच्या संघटनात्मक प्रयत्नांना मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः अशा वेळी जेव्हा तेलंगणामध्ये पक्षाची पाळंमुळे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पक्षश्रेष्ठींनी अद्याप त्यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली नसली तरी हा प्रकार तेलंगणा भाजपसाठी चिंता वाढवणारा ठरतो आहे.

राजा सिंग यांनी शेवटी स्पष्टपणे म्हटले आहे की, "मी हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आणि गोशामहलच्या जनतेसाठी माझे कार्य सुरूच ठेवणार आहे." त्यामुळे आता ते स्वतंत्र राजकीय वाटचाल करतील की नव्या राजकीय मंचावर सहभागी होतील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+