भाजपला राम-राम ठोकणारे T. Raja Singh यांच्याकडे किती आहे संपत्ती?, कशी करतात कमाई, जाणून घ्या सर्वच.
T. Raja Singh Networth : तेलंगणातील गोशामहल येथील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी भाजपचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा प्रदेशाध्यक्ष जी. किशन रेड्डी यांना पाठवलाय. आपल्या राजीनाम्यात त्यांनी पक्षाच्या राज्य नेतृत्वावरून सुरू असलेल्या वादावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.
राजीनाम्यात टी. राजा सिंह यांनी स्पष्ट केले की, ते फक्त पक्षापासून वेगळे होत आहेत, परंतु हिंदुत्व आणि धार्मिक सेवेबद्दलचे त्यांचे समर्पण कायम तसेच राहिल.
तेलंगणाचे भाजपचे तसेच हिंदुत्वाचे फायरब्रॅंड नेते टी. राजा सिंह यांनी त्यांच्या पत्रात "जय हिंद, जय श्री राम" लिहून पक्षाला अखेरचा राम-राम ठोकला. या घटनेने मात्र, बीजेपीला तेलंगणामध्ये मोठा फटका बसणार आहे. बीजेपीचा एक चेहराच पक्षाला सोडून गेल्याने आगामी काळात त्याचे राजकीय गणित देखील बदलू शकतात.

कोण आहेत टी-राजा सिंह
टी. राजा सिंह हे तेलंगणातील गोशामहल येथून तीन वेळा आमदार आहेत, जे २०१४, २०१८ आणि २०२३ मध्ये भाजपच्या तिकिटावर विजयी झाले होते.
त्यांना हिंदुत्व विचारसरणीचे कट्टर समर्थक मानले जाते आणि त्यांच्या तीक्ष्ण विधानांमुळे ते अनेक वेळा वादात सापडले आहेत. 2022 मध्ये पक्षाने त्यांना निलंबित केले, परंतु निवडणुकीपूर्वी ते मागे घेण्यात आले.
आज दिलेल्या राजीनाम्याच्या सत्रातर पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत, चला टी-राजा सिंह यांच्या एकूण संपत्तीवर एक नजर टाकूया...
T. राजा सिंह यांच्याकडे किती आहे मालमत्ता?
तेलंगणातील गोशामहल येथील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी त्यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या मालमत्तेची आणि कर्जाची माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता आहे, परंतु त्यांच्यावर मोठे कर्ज देखील आहे.
निवडणुकीच्या काळात निवडणुक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतीज्ञापत्रानुसार, टी. राजा सिंह यांच्याकडे एकूण मालमत्ता सुमारे 4.7 कोटी रुपये आहे. यापैकी, जंगम मालमत्तेचे मूल्य म्हणजे बँक बॅलन्स, वाहने, रोख रक्कम इत्यादी सुमारे 1.01 कोटी रुपये आहे. स्थावर मालमत्तेचे मूल्य म्हणजे जमीन आणि मालमत्ता सुमारे २.२९ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे.
कर्ज देखील कोटींमध्ये
आमदारांनी असेही सांगितले की त्यांच्यावर सुमारे १.८३ कोटी रुपये कर्ज आहे. एकूण मालमत्तेतून हे कर्ज वजा केल्यानंतर, त्यांची एकूण संपत्ती सुमारे १.४८ कोटी रुपये आहे.
माहिती आधीही देण्यात आली होती
टी. राजा सिंह यांनी मागील निवडणुकीत त्यांच्या मालमत्तेची माहिती देखील दिली आहे. प्रत्येक वेळी मालमत्ता आणि कर्जाच्या आकडेवारीत बदल झाले आहेत, जे काळानुसार स्वाभाविक आहे.
टी. राजा यांची राजकीय कारकीर्द
🔹 2009 : गोशामहल मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली, पराभवाला सामोरे जावे लागले.
🔹 2014 : भाजपमध्ये सामील झाले आणि पहिल्यांदाच गोशामहल येथून आमदार झाले. एआयएमआयएम उमेदवाराचा पराभव केला.
🔹 2018 : दुसऱ्यांदा आमदार झाले, गोशामहल मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले.
🔹 हिंदुत्ववादी प्रतिमा: त्यांच्या तीक्ष्ण आणि वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा चर्चेत असतात.
🔹 2022 : कथित आक्षेपार्ह विधानामुळे भाजपमधून निलंबित, अनेक गुन्हे दाखल.
🔹 2023 : भाजपने निलंबन संपवले, त्यांना पुन्हा तिकीट दिले आणि ते तिसऱ्यांदा विजयी झाले.
🔹 2024 : राज्य नेतृत्वावर नाराज झाल्यानंतर भाजपमधून राजीनामा दिला, परंतु हिंदुत्वाला पाठिंबा देत राहण्याची घोषणा केली.












Click it and Unblock the Notifications