दिल्लीत केजरीवालांचा पराभव, स्वाती मालीवाल म्हणाल्या- गर्व अन् अहंकारांचा नायनाट झाला, शिवीगाळ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. तर आत्तापर्यंत आलेल्या निवडणुकीच्या निकालात भाजप बहुमताने पुढे जात असल्याचे दिसून येत आहे. तर आम आदमी पक्ष मागे पडला आहे.
दरम्यान, आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. महाभारतातील द्रौपदीचे वस्त्रहरण करतानाचे छायाचित्र असलेली पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर करून आम आदमी पक्षावर टीका केली आहे. तर एएनआयशी बोलताना त्यानी अरविंद केजरीवाल यांचा अहंकाराला लोकांनी नाकारल्याचे म्हटले. गर्व आणि अहंकाराचा चक्काचूर झाला, केजरीवाल रागाच्या भरात वस्तू फोडतात, शिवीगाळ करतात, असाही आरोप त्यांनी केला.

स्वाती मालीवाल यांनी 'आप'वर टीकास्त्र सोडले
दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान स्वाती मालीवाल दिल्लीतील वेगवेगळ्या भागांना भेट देत आहेत आणि जनतेला भेडसावणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकत आहेत. शनिवारी त्यांनी महाभारताच्या वेळी द्रौपदीच्या वस्त्रहरणाचा एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्यांनी काहीही लिहिले नसले तरी त्यांचा संदर्भ थेट आम आदमी पक्षाविरुद्ध आहे.
स्वाती मालीवाल यांनी X वर आणखी एक पोस्ट केली आणि लिहिले की 'रावणातही अहंकार शिल्लक नव्हता.' माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी ही पोस्ट केली होती.
#WATCH | On #DelhiElection2025, Rajya Sabha MP Swati Maliwal says, "If we see the history - if something wrong happens to any woman, god has punished those who commit that... It's because of the issues like water pollution, air pollution and the condition of the streets, that… pic.twitter.com/7pxLQZGesi
— ANI (@ANI) February 8, 2025
'मी माझा पक्ष का सोडू?'
स्वाती मालीवाल यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, 'मी माझा पक्ष का सोडू, मी या पक्षाला (आप) १८ वर्षे दिली आहेत.' पक्षाविरुद्ध इतक्या तक्रारी असूनही आणि आपच्या एका जागेवरून राज्यसभा सदस्य असूनही त्या अजूनही पक्षात का आहेत असे विचारण्यात आले तेव्हा स्वाती मालीवाल यांनी हे सांगितले.
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) February 8, 2025
13 मे 2024 रोजी स्वाती मालीवाल त्यांच्या पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या होत्या. स्वातीने तिच्या तक्रारीत दावा केला होता की, ती ड्रॉईंग रूममध्ये वाट पाहत असताना, त्यांच्या सेक्रेटरी बिभव ने तिच्याशी गैरवर्तन केले. हा हल्ला कोणत्याही चिथावणीशिवाय झाला, त्यानंतर स्वातीने पीसीआर कॉल केला आणि पोलिसांना कळवले. या प्रकरणी स्वाती यांनी एफआयआरही दाखल केला होता.












Click it and Unblock the Notifications