Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

वक्फ बोर्डाबाबतच्या समितीत जोरदार राडा; मार्शलला बोलावून १० खासदारांना केले निलंबीत

वक्फ बोर्ड विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत आज चांगलाच राडा झाला. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत, एमआयएमचे खासदार असदुद्दीने ओवैसी यांच्यासह १० खासदारांना दहा दिवसांसाठी निलंबीत करण्यात आले. या खासदारांना रोखण्यासाठी अक्षरशः मार्शलची मदत घ्यावी लागली. ही बैठक आता २७ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.

Asasuddin Owairi

कसा झाला वाद?

या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी व भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या सुरुवातीला वाद झाला. मात्र नंतर त्या वादातून जोरदार हमरीतुमरी झाली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यानंतर मार्शलला पाचारण करण्यात आले. अखेर परिस्थिती नियंत्रणात न आल्याने १० खासदारांना समितीच्या सदस्य पदांवरुन निलंबीत करण्यात आले.

निलंबित खासदार कोणते?

कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए. राजा, असदुद्दीन ओवैसी, नसिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक, इम्रान मसूद या दहा खासदारांना निलंबीत करण्यात आले. वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ वरील संयुक्ती संसदीय समितीच्या बैठकीत हा गोंधळ झाला. निलंबनानंतर खा. कल्याण बॅनर्जी यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, बैठकीत अघोषित आणीबाणी सुरु आहे. अध्यक्ष कुणाचेच ऐकत नाही. अजेंडाही कलमानुसार बदलण्यात आला आहे.

ओवैसींचीही टिका

जेपीसीच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्यानंतर एमआयएमचे खा. असदुद्दीन ओवैसी यांनी सरकारवर टिका केली. ते म्हणाले, आम्हा सर्व प्रतिनिधींना म्हणणे मांडण्यासाठी वेळ वाढवून द्यावा. या समितीने बिहार किंवा पश्चिम बंगालला भेट दिलेली नाही. अनेक राज्यातील वक्फ बोर्डाचे सदस्य-अध्यक्ष आपली बाजू मांडू शकलेले नाहीत. ही समिती सर्वांचे म्हणणे ऐकून घेत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+