Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'एवढा धर्मांध सैन्यात काय करत होता?'; धार्मिक कट्टरतेमुळे बडतर्फ लष्करी अधिकाऱ्याला SCने फटकारले!

Supreme Court Slams Christian Officer : लष्करातील धार्मिक विधी आणि शिस्त पालनाशी संबंधित एका महत्त्वपूर्ण खटल्याच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) लष्करी शिस्तीबद्दल कठोर भूमिका घेतली आहे. धार्मिक परेडमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याबद्दल बडतर्फ करण्यात आलेल्या एका ख्रिश्चन अधिकाऱ्याची याचिका खंडपीठाने फेटाळून लावली. लष्करातील मूल्यांवर भाष्य करताना, न्यायालयाने अधिकाऱ्याच्या वर्तनाला 'अनुशासनहीन' ठरवून तीव्र नाराजी व्यक्त केली.

supreme court slams christian officer

अधिकाऱ्याची याचिका फेटाळली, न्यायालयाची तीव्र प्रतिक्रिया

भारतीय लष्कराच्या तिसऱ्या कॅव्हलरी रेजिमेंटचे माजी लेफ्टनंट सॅम्युअल कमलेसन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. धार्मिक परेडमध्ये सहभागी होण्यास नकार दिल्याच्या आधारावर २०२१ मध्ये त्यांना सैन्यातून काढून टाकण्यात आले होते.

सुनावणीदरम्यान, कमलेसन यांच्या वर्तनावर न्यायालयाने तीव्र प्रतिक्रिया दिली. सरन्यायाधीशांनी अधिकाऱ्याला उघडपणे अनुशासनहीन म्हटले आणि थेट सवाल केला, "एवढा धर्मांध सैन्यात काय करत होता?' धार्मिक श्रद्धा असलेल्या अशा भांडखोर आणि कट्टर व्यक्तीला सैन्यात कोणतेही स्थान नाही, असे म्हणत खंडपीठाने अधिकाऱ्याला पुन्हा कामावर घेण्याची याचिका फेटाळली.

मंदिर-गुरुद्वारात प्रवेशास नकार

याचिकेनुसार, २०१७ मध्ये कमिशन झाल्यानंतर कमलेसन यांना शीख तलवार दलात नियुक्त करण्यात आले. रेजिमेंटल परेड दरम्यान त्यांना मंदिर आणि गुरुद्वारामध्ये प्रवेश करण्यास सांगण्यात आले होते. मात्र, कमलेसन यांनी सातत्याने असे करण्यास टाळाटाळ केली. अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण मागितले असता, कमलेसन यांनी सांगितले की, ते ख्रिश्चन असल्याने ते मंदिर किंवा गुरुद्वाराच्या गर्भगृहात प्रवेश करू शकत नाहीत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही, अधिकाऱ्याने गुरुद्वारातील कीर्तनात सहभागी होण्यास नकार दिला होता.

लष्करी परंपरा, शिस्त धर्मापेक्षा मोठी!

सर्वोच्च न्यायालयाने लष्कराच्या बडतर्फीच्या निर्णयाचे समर्थन केले. अधिकाऱ्याच्या वकिलांनी भारताच्या धर्मनिरपेक्ष मूल्यांचा युक्तिवाद केला असला तरी, न्यायालयाने तो स्वीकारला नाही. न्यायालयाने स्पष्ट केले की, भारतीय लष्कराच्या रेजिमेंटमध्ये होणारे हे विधी आणि परेड केवळ धार्मिक श्रद्धेचा विषय नाहीत, तर ते लष्करी शिस्त आणि परंपरेचा भाग आहेत. ही शिस्त आणि परंपरा धार्मिक श्रद्धेच्या पलीकडे जाऊन पाळली पाहिजे.

लष्कराची बाजू!

लष्कराने न्यायालयाला सांगितले की, रेजिमेंटल क्रियाकलाप धार्मिक विधी नसून ते रेजिमेंटच्या परंपरेचा भाग आहेत. कमांडिंग अधिकाऱ्यांनी आणि खुद्द ख्रिश्चन धर्मगुरूंनीही कमलेसन यांना स्पष्ट केले होते की, 'सर्व-धर्म स्थळ'ला भेट देणे हे ख्रिश्चन धर्माच्या विरोधात नाही. २०२१ मध्ये सेवेतून काढून टाकण्यापूर्वी कमलेसन यांना पटवून देण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले आणि त्यांना लष्कराच्या मूल्यांबद्दलही सांगण्यात आले. तरीही, अधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने या कठोर विधानाद्वारे, लष्करामध्ये धर्मनिरपेक्षता, शिस्त आणि सामूहिक परंपरांचे पालन हे वैयक्तिक धार्मिक कट्टरतेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, हे अधोरेखित केले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+