'मध्यरात्री याचिका तयार करता का?'; कांदा-लसूणच्या 'तामसिक' वादावर सुप्रीम कोर्टाने फटकारले!
SC Dismisses PIL on Onion-Garlic Tamasic Claim : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एका वकिलाने दाखल केलेल्या पाच विचित्र जनहित याचिका (PIL) फेटाळून लावताना अत्यंत कडक टिप्पणी केली. कांदा आणि लसूण हे 'तामसिक' आहेत का, यावर संशोधनाची मागणी करणाऱ्या याचिकेसह इतर चार याचिकांना न्यायालयाने 'फालतू' आणि 'निराधार' ठरवले आहे. भारताचे सरन्यायाधीश (CJI) सूर्यकांत यांनी याचिकाकर्ते ॲडव्होकेट सचिन गुप्ता यांना विचारले की, "तुम्ही या सर्व याचिका मध्यरात्री तयार करता का?"

कांदा-लसूण आणि घटस्फोटाचा विचित्र तर्क
याचिकाकर्ते सचिन गुप्ता यांनी आपल्या याचिकेत असा दावा केला होता की, कांदा आणि लसूणमध्ये तामसिक किंवा नकारात्मक ऊर्जा असते, ज्याचा मानवी स्वभावावर परिणाम होतो. त्यांनी गुजरातचा एक दाखला देत म्हटले की, जेवणात कांद्याच्या वापरावरून एका जोडप्याचा घटस्फोट झाला आहे. यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.
जैन समाजाच्या भावनांचा प्रश्न
या याचिकेत जैन धर्माच्या खाण्यापिण्याच्या पद्धतींचा संदर्भ देण्यात आला होता. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलाला विचारले, "तुम्हाला जैन समाजाच्या भावना का दुखावयच्या आहेत?" जैन समाजात पारंपारिकपणे कांदा, लसूण आणि जमिनीखालील कंदमुळे खाणे वर्ज्य मानले जाते, मात्र त्यावर न्यायालयीन संशोधन करण्याची मागणी करणे हे अनावश्यक असल्याचे खंडपीठाने स्पष्ट केले.
"वकील नसता तर मोठा दंड लावला असता"
सरन्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने या याचिकांना 'निष्काळजीपणे मसुदा तयार करणे' आणि 'सर्वोच्च न्यायालयावर कामाचा भार टाकणे' असे संबोधले. खंडपीठ म्हणाले की, "जर तुम्ही वकील नसता, तर अशा याचिका दाखल केल्याबद्दल आम्ही तुम्हाला खूप मोठा दंड लावला असता. पुढच्या वेळी अशा प्रकारची याचिका दाखल केली, तर दंड आकारला जाईल, हे लक्षात ठेवा.
फेटाळलेल्या इतर 4 याचिका कोणत्या?
सचिन गुप्ता यांनी केवळ कांदा-लसूणच नव्हे, तर इतरही काही विषयांवर याचिका केल्या होत्या, ज्या न्यायालयाने फेटाळून लावल्या.
व्यसनमुक्ती: दारू आणि तंबाखू उत्पादनांमधील हानिकारक घटकांवर नियमन आणणे.
मालमत्ता : मालमत्तेची नोंदणी अनिवार्य करण्यासाठी निर्देश देणे.
भाषा : 'अभिजात भाषा' (Classical Languages) घोषित करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे ठरवणे.












Click it and Unblock the Notifications