सुनीता विल्यम्स अशा परतणार अंतराळातून माघारी,'नासा'ची नवी योजना
नवी दिल्ली : मूळच्या भारतीय वंशाच्या असणाऱ्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स अमेरिकन संशोधन संस्था नासाच्या अंतराळ मोहिमेवर आहेत. परंतु, तांत्रिक कारणाने सध्या अंतराळात अडकल्या आहेत. त्यांच्या अंतराळ वाहनात अवघा 27 दिवस पुरेल इतका इंधनाचा साठा शिल्लक आहे. आता त्यांच्या बचावासाठी नानाविध प्रयत्न सुरू झाले आहेत.

अंतराळात अडकलेल्या सुनीता यांच्या पृथ्वीवर परतण्याच्या दिवसाची प्रतीक्षा दिवसागणिक आणखी लांबत आहे. आता अवकाशात त्यांच्यापुढं आलेल्या या अडचणी नेमक्या कधी संपणार,हा यक्षप्रश्न आहे.आता एक आशेचा किरण दिसल्यामुळं सध्या सुनीला विलियम्स आणि त्यांचे सहकारी अंतराळवीर बुच विल्मोर यांना माघारी आणण्यासाठीच्या हालचालींना वेग येणार आहे.
एलोन मस्क करणार मदत:
मस्क यांची स्पेस एक्स ही संस्था नासाला या संकटात मोठी मदत करणार असल्याचं सांगितलं जात आहे. हेलियम गळतीमुळं बोईंगच्या परतीच्या प्रवासात अडचणी निर्माण होत आहेत.अशी माहिती नासाकडून देण्यात आली आहे.
विशेष यान पाठवणार?
अंतराळात अडकलेल्या अंतराळवीरांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी एक नवं यान पाठवलं जाऊ शकतं. न्यूयॉर्क युनिवर्सिटीतील कात्सुओ कुराबायशी यांच्या माहितीनुसार स्टारलायनरची सद्यस्थिती पाहता नासाच्या अंतराळवीरांना सुखरूप परत आणण्यासाठी स्पेस एक्सच्या क्रू ड्रॅगनसारख्या अंतराळयानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
जुलै महिना शेवटची आशा:
तज्ज्ञांच्या मते जुलै संपेपर्यंत अंतराळातून त्यांना परत आणणं गरजेचं आहे. अंतराळातील अवकाशयात्रींचं पृथ्वीवर परतणं लांबणीवर पडलं ते परिस्थिती आव्हानात्मक होईल, असं म्हटलं जातं आहे. तेव्हा आता नासा नेमक्या कोणत्या पर्यायांची निवड करून सुनीला विलियम्स आणि विल्मोर यांना परत आणतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. यामध्ये मस्क यांची स्पेस - एक्स ही संस्था महत्वाची भूमिका बजावणार आहे.
विशेष म्हणजे अवकाश मोहिमेदरम्यान अशा घटना घडतात,हे इतिहासात देख चित्र पाहायला मिळालं आहे. परंतु निर्माण झालेल्या अश्या प्रश्नावर वैज्ञानिक कस उपाय शोधत, यातच खरं यश दडलंय.












Click it and Unblock the Notifications