Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Sunita williams : सुनीता विल्यम्सच्या सुखरूप आगमनाबद्दल त्यांच्या मूळ गावात दिवाळी साजरी

Sunita williams News: भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स नऊ महिन्यांनंतर 19 मार्च रोजी पृथ्वीवर सुरक्षित परतल्या आहेत. सुनीता विल्यम्स यांना नासाच्या 8 दिवसांच्या मोहिमेअंतर्गत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात (ISS) पाठवण्यात आले होते, परंतु त्यांच्या अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बॅरी विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अवकाशात अडकले होते. त्यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन स्पेसएक्स पाठवण्यात आले होते.

केवळ नासाचे शास्त्रज्ञच नाही तर संपूर्ण जग सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्यासाठी प्रार्थना करत होते. सुनीता विल्यम्स पृथ्वीवर सुखरूप परतताच भारतीयांनी आनंद व्यक्त केला आहे.

Sunita Williams return

भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांच्या परतण्याबद्दल संपूर्ण भारतात उत्सव साजरा केला जात आहे. गुजरातमधील मेहसाणा येथील सुनीता विल्यम्स यांच्या मूळ गावी झुलावन येथे रात्री फटाके फोडून लोकांनी आनंद साजरा केला. त्याच वेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनीही सोशल मीडियावर एक सुंदर संदेश लिहून त्यांचे अभिनंदन केले आहे.

सुनीता विल्यम्स यांच्या मूळ गावी झुलासन येथे दिवाळी साजरी

फ्लोरिडाच्या किनाऱ्यावरील समुद्रात क्रू-9 च्या स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळयानाचे यशस्वी स्प्लॅशडाऊन होईपर्यंत सर्वांच्या श्वास रोखून धरला होता. ड्रॅगन स्पेसक्राफ्टच्या यशस्वी लँडिंगनंतर नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स बाहेर येताच लोक आनंदाने नाचू लागले. सुनीता विल्यम्सच्या मूळ गावी झुलासन येथील लोकांनी फटाके फोडून आनंद साजरा केला आहे.

मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी भारताच्या कन्येसाठी लिहिली खास पोस्ट

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) डॉ. जितेंद्र सिंह यांनी सुनीता विल्यम्सच्या पृथ्वीवर सुरक्षित परतण्याबद्दल X वर एक संदेश लिहिला. त्यांनी लिहिले की, "अभिमान, गौरव आणि दिलासाचा क्षण! अवकाशातील अनिश्चिततेला तोंड देण्याच्या धैर्याने, दृढनिश्चयाने आणि संयमाने इतिहासात नोंद झालेल्या भारताच्या या गौरवशाली कन्येच्या सुरक्षित पुनरागमनाचा आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण जग एकत्र आले आहे."

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+