Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

यामुळे प्रतिष्ठेला धक्का... राष्ट्रपतींवरील टिकेनंतर सोनिया गांधींना राष्ट्रपती भवनाकडून उत्तर

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज सुरु झाले. पहिल्याच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संयुक्त सभागृहासमोर भाषण केलं. त्यांचे भाषण सुमारे ४९ मिनिटे चाललं. राष्ट्रपतींच्या भाषणानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी त्यांच्यावर प्रतिक्रिया दिली. बिचाऱ्या राष्ट्रपती अर्थात पुअर लेडी, असं सोनिया गांधी यांनी राष्ट्रपतींनी उद्देशून म्हटल्यानंतर आता भाजप व राष्ट्रपती भवनानेही सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

Sonia Gandhi

काय म्हणाल्या सोनिया गांधी

राष्ट्रपतींचं अभिभाषण झाल्यावर सोनिया गांधी यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावेळी त्यांनी मीडियाला थेट उत्तर दिलं नाही. मात्र नंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना दिसले. त्यानंतर सोनिया गांधी यांनी मीडियाशी संवाद साधला. सर्व खोटी आश्वासने दिली आहेत, असं सोनिया गांधी म्हणाल्या. तर राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या भाषणाला बोअरिंग म्हटलं. त्यावर पुअर लेडी असं सोनिया गांधी म्हणाल्या. राष्ट्रपती शेवटी शेवटी तर थकून गेल्या होत्या. त्या मोठ्या महत्प्रयासाने बोलत होत्या, असा चिमटाही सोनिया गांधी यांनी काढला.

राष्ट्रपती भवनाचं उत्तर

सोनिया गांधी यांच्या विधानानंतर राष्ट्रपतींच्या प्रेस सचिवांनी एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी सोनिया गांधी यांच्यावर जोरदार हल्ला केला. सोनिया गांधी यांचं विधान दुर्देवी आहे, अशा शब्दांत त्यांच्यावर टिका करण्यात आली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात करण्यापूर्वी दिलेल्या भाषणात राष्ट्रपती थकल्या नव्हत्या, असं राष्ट्रपती भवनाकडून स्पष्ट करण्यात आलं. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांच्या टिपण्णीमुळे एका उच्चपदस्थांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. अशा टिपण्ण्या या दुर्देवी असून त्या टाळता येतात, असंही राष्ट्रपती भवनानं म्हटलं आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+