Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

श्रीनगरातील स्फोट दुर्घटना की दहशतवादी कटाचा भाग?, 9 जणांच्या मृत्यूला कारणीभूत कोण कसा घडला थरार!

srinagar naugam blast Update News : शुक्रवारी रात्री उशिरा श्रीनगरमधील नौगाम पोलीस ठाण्यात झालेल्या शक्तिशाली स्फोटामुळे जम्मू आणि काश्मीर हादरले. या दुःखद अपघातात आतापर्यंत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून, २७ हून अधिक जण जखमी झाले आहेत.

फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी ज्यावेळी स्टेशनवर जप्त केलेल्या स्फोटकांची तपासणी करत होते, त्याच वेळी हा स्फोट झाल्याने, या घटनेमागे केवळ 'हाताळणीतील चूक' आहे की 'दहशतवादी कट' याचा सखोल तपास सुरू आहे.

srinagar naugam blast

नेमकी घटना कशी घडली?

नौगाम पोलीस ठाण्यात फॉरेन्सिक टीम आणि पोलीस अधिकारी एका महत्त्वाच्या दहशतवादी मॉड्यूल प्रकरणाच्या अनुषंगाने काम करत होते. हरियाणातील फरीदाबाद येथून उघडकीस आणलेल्या एका मोठ्या 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करताना जप्त करण्यात आलेली स्फोटके आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य याच पोलीस स्टेशनमध्ये तपासणीसाठी ठेवण्यात आले होते.

ज्यावेळी पोलीस आणि फॉरेन्सिक टीम तपास करत होती, त्याचवेळी स्फोट झाला. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की, पोलीस ठाण्याच्या इमारतीचे मोठे नुकसान झाले. स्फोटानंतर काही छोटे स्फोटही झाले, ज्यामुळे आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या दुर्दैवी अपघातात ज्या नऊ जणांचा मृत्यू झाला आहे, त्यामध्ये खालील तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचे समोर आले. यात विशेष तपास संस्थेचा (एसआयए) एक अधिकारी, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) चे तीन तज्ज्ञ, दोन छायाचित्रकार, महसूल विभागाचे दोन अधिकारी व एक स्थानिक शिंपी. याव्यतिरिक्त, तीन नागरिकांसह एकूण २७ लोक जखमी झाले आहेत.

स्फोटाचे संभाव्य कारण काय?

प्राथमिक तपासात स्फोटामागील कारण स्पष्ट झालेले नाही, पण तपासकर्त्यांनी काही महत्त्वपूर्ण शक्यतांवर लक्ष केंद्रित केले आहे.

हाताळणीतील चूक

फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL) टीम गेल्या दोन दिवसांपासून जप्त स्फोटक पदार्थांची तपासणी करत होती. प्राथमिक तपासानुसार, पोलीस स्टेशनमध्ये जप्त केलेले ३५० किलोग्राम अमोनियम नायट्रेट सील करताना आणि हाताळताना मानवी चूक झाली असावी. अमोनियम नायट्रेट हे अत्यंत संवेदनशील रसायन आहे आणि ते हाताळण्यात थोडीशीही निष्काळजीपणा मोठ्या स्फोटाला आमंत्रण देऊ शकते.

रासायनिक अस्थिरता

तज्ज्ञांच्या मते, स्फोटकांची अस्थिरता केवळ हालचाल किंवा हाताळणीमुळे होत नाही. तापमानातील बदल, रासायनिक रचना आणि काही विशिष्ट घटकांच्या संपर्कात येणे यासारखे गंभीर घटक देखील स्फोटाला कारणीभूत ठरू शकतात. अचानक रासायनिक अस्थिरतेमुळे स्फोट झाला की बाह्य घटकामुळे, याचा तपास पथक करत आहे.

दहशतवादी कटाचा संशयावर डीजीपींचे स्पष्टीकरण!

जप्त केलेले स्फोटक पदार्थ हरियाणातील फरीदाबाद येथून आणलेल्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले असल्याने, या घटनेमागे दहशतवादी कटाचा दृष्टिकोन देखील प्राधान्याने तपासला जात आहे. हे मॉड्यूल जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या दहशतवादी संघटनांशी जोडलेले असल्याचे पोलिसांचे मत आहे.

तथापि, जम्मू आणि काश्मीरचे डीजीपी नलिन प्रभात यांनी यावर तातडीने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी स्पष्ट केले की नौगाम पोलीस स्टेशनमधील हा स्फोट अपघाती होता आणि यात कोणताही दहशतवादी कट रचलेला नव्हता. डीजीपींच्या स्पष्टीकरणामुळे 'दहशतवादी कटा'च्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असला तरी, स्फोटाच्या अचूक कारणांचा तपास सुरू आहे.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+