Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

काँग्रेस नेत्या सोनिया गांधींची प्रकृती बिघडली, दिल्लीतील गंगाराम रुग्णालयात दाखल

Sonia Gandhi Hospitalized: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची प्रकृती गुरुवारी (20 फेब्रुवारी) अचानक बिघडली आहे. त्यानंतर त्यांना दिल्लीतील सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जिथे त्याचं रुटीन चेकअप करण्यात आलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार डॉक्टरांची एक टीम त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.

दरम्यान सोनिया गांधी यांना आरोग्याच्या काही समस्या आहेत. अशा परिस्थितीत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, जिथे डॉक्टरांची एक टीम त्याच्यावर लक्ष ठेवून आहे. याआधीही सोनिया गांधींना प्रकृती अस्वास्थ्यामुळे अनेक वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

sonia gandhi

सोनिया गांधी यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांची प्रकृती सध्या ठीक आहे. यामुळे त्यांना आज शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती आहे.

पोटाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल

काही माध्यमांच्या वृत्तांनुसार, सर गंगा राम रुग्णालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष डॉ. अजय स्वरूप यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांना पोटाच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार चिंतेचे कोणतेही मोठे कारण नाही.

सोनिया गांधी गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. समीरन नंदी यांच्या देखरेखीखाली असल्याची माहिती मिळाली आहे. सोनिया गांधी यांना शेवटचे 13 फेब्रुवारी रोजी संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान राज्यसभेच्या कामकाजादरम्यान सार्वजनिकरित्या पाहिले गेले होते. यापूर्वी 10 फेब्रुवारी रोजी त्यांनी केंद्र सरकारवर जनगणना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी दबाव आणला होता. देशातील सुमारे 14 कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्याच्या लाभांपासून वंचित आहेत, असा दावाही त्यांनी राज्यसभेत केला होता.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+